वेध शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंचे यश
schedule19 Jun 24 person by visibility 429 categoryक्रीडा

महाराष्ट न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर:महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्यावतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या कॅप्टन इझीकल स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये वेध शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी यश मिळवले. अकॅडमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्णपदक, एक रौप्य पदक आणि चार कास्यपदक अशी एकूण सात पदकांची कमाई केली.
हिरण्या सासणे हिने दहा मीटर एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३९५ गुण मिळवत वरिष्ठ गटात एक कास्य पदक ज्युनिअर गटात एक रौप्य पदक तर युथ व सबयुथ अशा दोन्ही गटांमध्ये दोन सुवर्णपदके अशी चार पदक पटकावली.
याच प्रकारात युगरत्न शर्मा हिने ४०० पैकी ३९१ गुण मिळवत सब युथ व युथ गटात दोन कास्य पदके मिळवली. मुलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात रिधांश पाटीलने* वरिष्ठ व कनिष्ठ गटात ४०० पैकी 384 गुण मिळवत दोन कांस्य पदक मिळवली.
तसेच साई खोत, देवेन पाटील, मानसी सावंत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व खेळाडूंची ऑल इंडिया जी. व्ही. माळवणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले - हवालदार, रोहित हवालदार , धैर्यशील देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.