आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यश
schedule21 Aug 26 person by visibility 14 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: देवभूमी हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट व किशोर प्रभाकर पटवर्धन यांच्यातर्फे आर्किटेक्चर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित डिझाईन स्पर्धेत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. मानवनिर्मित (कृत्रिम) धबधबा या विषयावर आधारित या स्पर्धेचा अंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. स्पर्धेत महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी दिया दापके व निहाल मुलतानी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थी शर्वत हावळ याने द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेसाठी ज्येष्ठ वास्तुविशारद महाजनी आणि वास्तुविशारद राहूल पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य चिदंबर दुदगीकर, आयक्यूएसी समन्वयक प्रा. मनोरमा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.