Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
टीडीएफची रविवारी पुण्यात बैठक, शिक्षक आमदारकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीप्रशासनाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या शाळांना पत्र, डिजीटल फलक अद्ययावत करावाअधिकारी कंत्राटदारांची मिलीभगत, रस्ते कामात ढपला - डिझेल विक्रीत डल्ला ! महापालिका सभेत नगरसेवकांकडून पोलखोल ! !भोई समाजातर्फे रक्षाबंधनानिमित्त गरीब महिलांना  रविवारी साड्या वाटपाचा कार्यक्रमतेली समाजाचा राज्यव्यापी मेळावा रविवारी कोल्हापुरात ! चंद्रशेखर बावनकुळे, विजय वडेट्टीवारांची उपस्थिती !!कोल्हापुरात 22 ऑगस्टला जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावाहसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहनपाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!

जाहिरात

 

प्रशासनाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या शाळांना पत्र, डिजीटल फलक अद्ययावत करावा

schedule20 Aug 26 person by visibility 28 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महापालिकेच्या मालकीच्या शाळेतील डिजीटल फलक अद्ययावत करावेत. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या  नावासमोरील जात प्रवर्ग व संवर्ग उल्लेख असलेले फलक तत्काळ काढून टाकावेत असे पत्र प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांना काढले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या शाळेमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी, महापालिकेच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला होता. वास्तविक महापालिका शाळेत शिक्षकांच्या नावासमोर जातीचा नव्हे प्रवर्गांचा उल्लेख असलेले फलक अनेक वर्षापासून आहेत. शिक्षकांच्या नावासमोर ते ज्या प्रवर्गातील आहेत, त्या प्रवर्गाचा उल्लेख उदाहरणार्थ ओपन, एनटी, एससी, एसटी, ओबीसी असा उल्लेख करणारे फलक शाळेत आहेत. दरम्यान या फलकावरुन नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाधिकारी जाधव यांनी काढले आहेत. त्या संबंधीचे पत्र त्यांनी शिक्षण समितीच्या अखत्यारितील महापालिका शाळांना पाठविली आहेत. तसेच प्राथमिक शिक्षण समितीची कार्यकारिणी अस्तित्वात आली आहे. सभापती, उपसभापती व सदस्यांची निवड झाली आहे. फलकावर त्यांच्या नावासह शाळा प्रभागातील नगरसेवकांची नावे, शिक्षण समिती व समग्र शिक्षाकडील अधिकाऱ्यांच्या नावाची माहिती असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

…………………….

त्या शाळेकडून खुलासा मागविणार

शिक्षकांच्या नावासमोर जातीचा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करत नगरसेवकांनी शाळेचा फलक सभागृहात दाखविला होता. आयुक्तांनी, याप्रश्नी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला नोटिस पाठवून खुलासा मागवून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण समितीकडून संबंधित शाळा मुख्याध्यापकांना नोटिस काढण्यात आली आहे. त्यांना यासंबंधी म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes