हसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन
schedule20 Aug 26 person by visibility 33 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ना. हसन मुश्रीफ फाउंडेशन, कागल यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अंगणवाडी सेविकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे माजी चेअरमन नविद मुश्रीफ व के डी सी बँकेचे संचालक भैय्या माने यांनी दिली. पुरस्कारासाठीचे प्रस्ताव हसन मुश्रीफ फौंडेशन शाखा कागल, मुरगूड, गडहिंग्लज व उत्तूर येथे रविवार ३० ऑगष्ट 2026 पर्यंत जमा करावेत असे आवाहन करणेत आले.याप्रसंगी शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ, कोजिमाशिचे चेअरमन राजेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन जी एस पाटील, तज्ञ संचालक सुकुमार पाटील, टी एस सामंत उपस्थित होते.