Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रशासनाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या शाळांना पत्र, डिजीटल फलक अद्ययावत करावाअधिकारी कंत्राटदारांची मिलीभगत, रस्ते कामात ढपला - डिझेल विक्रीत डल्ला ! महापालिका सभेत नगरसेवकांकडून पोलखोल ! !भोई समाजातर्फे रक्षाबंधनानिमित्त गरीब महिलांना  रविवारी साड्या वाटपाचा कार्यक्रमतेली समाजाचा राज्यव्यापी मेळावा रविवारी कोल्हापुरात ! चंद्रशेखर बावनकुळे, विजय वडेट्टीवारांची उपस्थिती !!कोल्हापुरात 22 ऑगस्टला जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावाहसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहनपाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्र

जाहिरात

 

अधिकारी कंत्राटदारांची मिलीभगत, रस्ते कामात ढपला - डिझेल विक्रीत डल्ला ! महापालिका सभेत नगरसेवकांकडून पोलखोल ! !

schedule20 Aug 26 person by visibility 14 categoryमहानगरपालिका

विकासकामांसाठी अतिरिक्त आयुक्त् - उपायुक्त् रस्त्यावर कधी उतरणार ! !

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  :  कोल्हापूर शहरात गेल्या दोन वर्षात ३०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केल्याची आकडेवारी समोर आहे. मात्र अधिकारी आणि कंत्राटदरांची मिलीभगत यामुळे शहरात निकृष्ट दर्जाचे  रस्ते झाले. दोषदायित्वाच्या कालावधीतच रस्ते खराब होत असतील तर कामाची गुणवत्ता किती बेकार आहे हे स्पष्ट होत आहे. महापालिकेने येत्या पंधरा दिवसात २५ लाख खर्चावरील  रस्त्यांचा स्पॉट रिपोर्ट तयार करुन दोषीवर कारवाई करावी. र्थड पार्टी ऑडिट हे निष्पक्षपातीपणे झाले पाहिजे. तसेच प्रत्येक कामाची जबाबदारी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर न सोपविता अतिरक्त आयुक्त, उपायुक्त ही मंडळी रस्त्यावर उतरुन प्रत्यक्ष कामाची पाहणी कधी करणार असा हल्लाबोल नगरसेवकांनी केला.

कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी १९ ऑगस्ट रोजी झाली. या सभेत रस्ते कामावरुन पुन्हा एकदा प्रशासन लक्ष्य ठरले. महापौर रुपाराणी निकम सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभागृहाच्या भावना लक्षात घेत आयुक्त राजेंद्र भारुड यांनी  शहरात दर्जेदार रस्ते तयार व्हावेत यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी व ठेकेदारांची संयुक्त बैठक होणार आहे. सूचना करुनही ठेकेदारांकडून गुणवत्तापूर्ण काम झाले नाही तर संबंधित ठेकेदारांवर ब्लॅकलिस्टची कारवाई होईल.’असे स्पष्ट केले. शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी रस्ते कामाकडे लक्ष वेधले. आमदार, खासदार सरकारकडे पाठपुरावा करुन निधी आणतात. त्या निधीतून विकासकामे करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. शंभर कोटीतून सोळा रस्ते तयार होणार होते. मात्र असे चित्र निर्माण केले की, त्या निधीतून संपूर्ण शहरातील रस्ते होणार आहेत. प्रशासनाने नेमकी वस्तुस्थिती का स्पष्ट केली नाही. शंभर कोटीतून कोणते रस्ते झाले, पावसामुळे कोणते रस्ते अपूर्ण आहेत याची यादी जाहीर करावी.’अशी सूचना केली.

 महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी रस्त्यांच्या गुणवत्तेवरुन प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे काढले. लाटकर म्हणाले, ‘ अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांसोबतच्या अभद्र युतीमुळे विकासकामांचा बोजवारा उडत आहे. अशा भ्रष्ट कंत्राटदारांना पाठीशी घालताना लोकप्रतिनिधींनी लक्ष्मणरेषा पाळली पाहिजे. कंत्राददार श्रीमंत आणि शहरातील रस्त्यांची वाट असे चित्र दिसत आहे. गेल्या दोन वर्षात विविध माध्यमातून शहरात ३०० कोटी रुपये रस्ते कामासाठी खर्च केल्याची आकडेवारी आहे. इतका निधी खर्चून शहरात दर्जेदार रस्ते झाले नाहीत, डांबर दिसत नाही. कामात गुणवत्ता नाही. या साऱ्या कामाची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.’

 प्रा. जयंत पाटील यांनी विकासकामांसाठी खासदार, आमदार निधी आणतात, मात्र वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी फिरकत नाहीत. कामाची पाहणी करत नाहीत.दोष अधिकारी आणि कंत्राटदारांचा, बदनामी मात्र निधी आणणाऱ्या आमदारांचीअसला प्रकार खपवून घेतला जाणार नाही.’असे ठणकावले. नगरसेविका सुषमा जरग, मानसी लोळगे यांनी रामानंदगर ते जरगनगर मार्गावरील विद्युत दिव्याचा खांब कधी हटवणार असा सवाल केला. नगरसेविका माधुरी नकाते यांनी क्रीडा संकुल येथील  रस्ताच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले. सभागृह नेते मुरलीधर जाधव, नगरसेवक आदिल फरास, सुनील मोदी,नियाज खान, प्रतिज्ञा उत्तुरे, पूर्वा राणे यांनीही शहरातील रस्ते कामावरुन प्रशासनाला जाब विचारला. शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

…………………

महिला स्वच्छतागृहावरुन नगरसेविका आक्रमक

कोल्हापूर शहरात महिला स्वच्छतागृहे अपुरी आहेत. त्या ठिकाणी स्वच्छता, साफसफाई होत नाहीत. बाहेरगावाहून आलेल्या महिला भाविकांची गैरसोय होते. याकडे नगरसेविका दीपाली घाटगे, पल्लवी देसाई, अनुराधा खेडकर यांनी लक्ष वेधले. या प्रश्नावर प्रशासनाने सात ठिकाणी ४५ लाख रुपये खर्चून अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. नगरसेविका सृष्टी जाधव यांनी टाकाळा खणीची स्वच्छता करावी अशी मागणी केली. त्यावर प्रशासनाने स्वच्छता करण्याची ग्वाही दिली. नगरसेविकेंनी शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

………………

डिझेलमध्ये डल्ला

महापालिकेतर्फे शहरात धूर फवारणी केली जाते. धूर फवारणी मशिनचा वापर होतो. मात्र या मशिनमधील डिझेलकाढून त्याची विक्री केली जाते. सत्तर  रुपये लिटर याप्रमाणे या डिझेलची विक्री गेली कित्येक दिवस सुरू आहे. डिझेलमध्ये डल्ला मारणाऱ्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नगरसेवक अमर समर्थ व वैभव माने यांनी केली. धूर फवारणी मशिनमधील डिझेल विक्री करणारे कोण आहेत त्याचा शोध घ्या असेही ते म्हणाले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes