तेली समाजाचा राज्यव्यापी मेळावा रविवारी कोल्हापुरात ! चंद्रशेखर बावनकुळे, विजय वडेट्टीवारांची उपस्थिती !!
schedule20 Aug 26 person by visibility 19 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात 23 ऑगस्ट 2026 रोजी राजव्यापी मेळावा आयोजित केला आहे. या राज्यस्तरीय तेली समाजाच्या मेळाव्याला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नष्टे लॉन येथे हा मेळावा होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तेली समाजाचा पहिल्यांदाच राज्यस्तरीय मेळावा होत आहे. या मेळाव्याला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांच्यासह महासभेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये तेली समाजाच्या राजभरातील सर्व पोटजातींचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात बारा मागण्या मंत्री बावनकुळे, काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांच्यासमोर मांडण्यात येणार आहेत. यामध्ये, ' संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र महामंडळाचा दर्जा द्यावा. महामंडळासाठी अध्यक्षपद निर्माण करावे आणि त्याला राज्य मंत्रीपदाचा दर्जा द्यावा. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे त्यासाठी पन्नास एकर जागा तातडीने अधिग्रहण करून शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी. मुंबई येथे तेली समाजभवनासाठी पाच एकर जागा मंजूर करावी ' यासह बारा मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे अशी माहिती विभूते यांनी दिली. पत्रकार परिषदेला निलेश संकपाळ, उदय करपे, संदीप मुंढेकर, राजेंद्र लोखंडे, सुरेश मांजरेकर, विश्वनाथ माळकर, शिवमुर्ती झगडे आदी उपस्थित होते.