Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भोई समाजातर्फे रक्षाबंधनानिमित्त गरीब महिलांना  रविवारी साड्या वाटपाचा कार्यक्रमतेली समाजाचा राज्यव्यापी मेळावा रविवारी कोल्हापुरात ! चंद्रशेखर बावनकुळे, विजय वडेट्टीवारांची उपस्थिती !!कोल्हापुरात 22 ऑगस्टला जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावाहसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहनपाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरण

जाहिरात

 

भोई समाजातर्फे रक्षाबंधनानिमित्त गरीब महिलांना  रविवारी साड्या वाटपाचा कार्यक्रम

schedule20 Aug 26 person by visibility 24 categoryसामाजिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था कोल्हापूर शाखेच्यावतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी समाजातील गरीब महिलांना साड्या वाटप करण्यात येणार आहे.  खासदार शाहू महाराज  व उद्योगपती परशुराम तावरे यांच्या हस्ते आणि संस्थेचे महासचिव गजानन साटोटे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. एकनाथ काटकर व कार्याध्यक्ष विजयराव भोई यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शहाजी छत्रपती कॉलेज  परिसरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, भोई समाज संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष हिम्मतराव मोरे, महिला आघाडी अध्यक्ष सविता डाहे, मराठवाडा महिला अध्यक्ष अनिता लाडे, संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक नानासाहेब लकारे, युवा अध्यक्ष चंद्रकांत लाडे, विदर्भ महिला अध्यक्ष अलका पसारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती प्रा. काटकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष पिंटू भोई, शहराध्यक्ष किशोर आयरे, विभागीय सचिव उत्तम नलवडे,  आनंदराव भोई, रामभाऊ गुजर, दिलीप आयरे, हनुमंतराव आपटे, मधुकर करंजे, अनिल भोई, हर्षदा पोवार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes