Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

मेन राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभव

schedule21 Jun 25 person by visibility 643 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषद संचलित मेन‌ राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला विविध योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभव. ' एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग' या ब्रीदवाक्याने साजरा होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रशालेतील ऐतिहासिक सभागृहामध्ये प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांच्या अध्यक्षस्थानी होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक अजय किल्लेदार व योगशिक्षिका शिवानी पाटगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना समारंभ झाला. 
योगासनांमुळे केवळ शरीराचं नाही, तर मनाचंही स्वास्थ्य सुधारतं. अभ्यास करताना येणारा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली व प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वृद्धिगंत होण्यासाठी, मनाची एकाग्रता वाढविण्यासाठीची योगासने योगशिक्षिका शिवानी पाटगांवकर यांनी प्रात्यक्षिक कृतीतून सांगितली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ शिक्षक अजय किल्लेदार यांनी विद्यार्थ्यांना रोज सकाळी करता येईल अशा प्राणायाम व विविध सोपी योगासने  सांगितली.  प्रा. बी.पी.माळवे यांनी स्वागत केले. प्रा. सुषमा पाटील यांनी आभार केले.
 या कार्यक्रमास  उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक वेदांत कुंभार,  प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक व १२ वीचे विद्यार्थी  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes