करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिक
schedule25 Aug 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक
काटकसरीतून उभारलेली नूतन इमारत ही सभासदांच्या विश्वासाची पोहोचपावती : शिक्षक आमदार जयंत आसगावकर
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : करवीर आणि हातकणंगले तालुका माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असून, संस्थेने गेल्या २९ वर्षांत सभासदांच्या हिताला प्राधान्य देत उल्लेखनीय प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी केले. शिरोली पुलाची येथे पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शिक्षक सभासदांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास आणि विद्यमान संचालकांनी केलेली काटकसर यामुळे नूतन इमारतीची उभारणी शक्य झाली असून, ही इमारत म्हणजे संस्थेच्या कार्याची आणि सभासदांच्या विश्वासाची खरी पोहोचपावती आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
संस्थेच्या २९ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संस्थापक एस. डी. लाड यांनी प्रास्ताविक संस्थेच्या उभारणीपासून आजपर्यंत योगदान देणारे माजी संचालक, विद्यमान संचालक तसेच सभासद बंधू यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी संस्थापक संचालक, माजी संचालक, विद्यमान संचालक, निवृत्त सभासद तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील तसेच वडगाव मार्केट कमिटीचे सभापती सुरेश पाटील यांनी मनोगतातून पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, हातकणंगले पंचायत समिती सदस्या सौ. कमल कौंदाडे , शिरोली सरपंच पद्मजा करपे, शिक्षक नेते दादासो लाड, सुरेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार, प्रकाश कौदाडे, खंडेराव जगदाळे, बी. जी. बोराडे, अभिजीत गायकवाड, मनोहर परीट, व्ही. जी. पोवार, संस्थेचे सचिव गणपतराव चव्हाण, बाबासो पाटील, इंजिनिअर विवेक शेटे (शिरोली) उपस्थित होते. यावेळी विद्यमान संचालक रामदास पाटील, पंढरीनाथ खराडे, डॉ. दिपक शेटे, दीपक पाटील, प्रल्हाद खाडे, कृष्णराव पाटील, संदीप पाथरे, बबन हुजरे, राजेंद्र जाधव. वर्षा पाटील, मुक्ता धुमाळ,विलास वडगावकर, विश्वास पाटील उपस्थित होते.
डॉ. दीपक शेटे व बसगारे यांनी सूत्रसंचालन केले.व्हाइस चेअरमन नामदेव कांबळे यांनी आभार मानले.