Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज ददआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाईएसएनडीटी विभागीय युवा महोत्सव गाजविला शहीद वीरपत्नीच्या विद्यार्थिनींनी ! सोळा पदकांची कमाई !!शिवाजी विद्यापीठाचा सतीश काळसेकर पुरस्कार प्रभा गणोरकर, रवी कोरडे यांना जाहीरबिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा

जाहिरात

 

उचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिक

schedule25 Aug 26 person by visibility 14 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील उचगावमधील नागरिकांना चांगले रस्ते, पायाभूत सुविधा देण्यासाठी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भाजपचे सदस्य प्रयत्नशील आहेत. उचगावातील अंतर्गत रस्त्यांसह अन्य कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे यांना १ कोटी रूपयांचा निधी देवू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. उचगाव मध्ये रस्ते कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
करवीर तालुक्यातील उचगावचे जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे आणि पंचायत समिती सदस्य तानाजी कांबळे यांच्या स्वनिधीतून, १५ लाख रूपये खर्च करुन अंतर्गत रस्ते केले जाणार आहेत. त्यामध्ये जय महाराष्ट्र ग्रुप ते क्लासीक ग्रुप पर्यंतचा रस्ता आणि एमटीएम मंगेश गल्ली या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. त्याचा आज शुभारंभ झाला. त्यासाठी खासदार महाडिक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचे उचगावमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर खासदार महाडिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ झाला. स्थानिक विकास निधीतून उचगाव मध्ये कॉंक्रीटचे रस्ते होतील. त्यामुळे पुढील १५-२० वर्षे रस्त्याचा प्रश्‍न उद्भवणार नाही. केंद्रात, राज्यात, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता असल्यानं, निधी कमी पडू देणार नाही. वाईंगडे यांना १ कोटी रूपयांचा निधी देवून, उचगावचा चेहरामोहरा बदलला जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तलहा मणेर, महालिंग जंगम यांनीही मनोगत व्यक्त करत, विकास निधीची मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य रमेश वाईंगडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes