Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येचा प्रश्न विधानपरिषदेतपालकमंत्र्यांनी बुलेट चालवत नोंदविला मिलेट महोत्सव रॅलीत सहभागशिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवावे : सुप्टाची मागणीउपमुख्यमंत्र्यांच्यासोबत हद्दवाढप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक राजमाता जिजाऊ रथयात्रेचे गोकुळतर्फे स्वागतशिवाजी विद्यापीठ नावासंबंधी शिवप्रेमींची शनिवारी बैठकमहापालिकेची कोल्हापूर शहर-गांधीनगरात कारवाई, पाच हजार किलो प्लॅस्टिक जप्तथकबाकीपोटी कोटीतार्थ मार्केटमधील पाच दुकान गाळे सील भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाखाची देणगी तिटवे येथे होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात ! लतिका कांबळेने जिंकली मानाची पैठणी ! !

जाहिरात

 

राज्याचे आरोग्य विषयक धोरण बनणार, रुग्णालयांना नामांकन ! आरोग्य पर्यटनावर फोकस !!

schedule07 Feb 25 person by visibility 191 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्याच्या इतिहासात प्रथमच ‘आरोग्य विषयक धोरण’ बनविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. राज्याच्या आरोग्य धोरणात महत्वाचा भाग असलेल्या ‘आरोग्य पर्यटन’विषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात आरोग्य पर्यंटनाला चालना देण्याचा तसेच त्या माध्यमातून रोजगार निर्मिती व आरोग्य विषयक सुविधांची निर्मितीबाबत सूचना केल्या.

भारतात अनेक ठिकाणी परदेशीं नागरिक वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देवून, महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. आरोग्य पर्यटन प्रकल्पात उत्तम सेवा देणाऱ्या खासगी रुग्णालयाना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागातर्फे रुग्णालयाना नामांकन देण्यात येणार आहे. नामांकन प्राप्त रुग्णालयांची सेवा, पायाभूत सुविधा, संबंधित डॉक्टराचे शिक्षण, अनुभव या बाबतची माहिती सरकारच्या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे जगभरातील रुग्ण महाराष्ट्रातील सरकारी व खासगी रुग्णाल्ययात उपलब्ध सेवेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे खासगी व सरकारी रुग्णालयात आर्थिक उन्नती होईल. सरकारी रुग्णालये सुद्धा उत्तम सेवा देवून खासगी रुग्णालयाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करतील असा विश्वास आबिटकर यांनी व्यक्त केला.

आरोग्य पर्यटन विषयाचा मसुदा तयार करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे. या अभ्यास गटामधील तज्ञ अधिकारी राज्यातील नामांकित खासगी रुग्णालये, विविध शहरातील रुग्णालये, आयुष विभाग, पर्यटन विभाग, नॅचरोपॅथी विभाग व माध्यम प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. त्यांच्या सूचना घेऊन एक सर्वसमावेशक आरोग्य पर्यटन धोरण बनवणार आहे. राज्याच्या आरोग्य धोरणामध्ये आरोग्य पर्यटन हा महत्वाचा भाग असेल. म्हणून आरोग्य पर्यटन विषयाला गती देण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला आरोग्य सचिव डॉ.निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ.नितीन आंबाडेकर यांचेसह अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes