राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण जलतरण स्पर्धेस कोल्हापुरात प्रारंभ
schedule15 Sep 22 person by visibility 974 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्विमिंग हब कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण जलतरण स्पर्धेत कोल्हापूर येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील जलतरण तलाव या ठिकाणी गुरुवारी 15 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आणि महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष श्रीमती सरोज एन पाटील, उद्योजक व्ही बी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन झाले. राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून 538 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. संयोजक रमेश मोरे यांनी स्वागत केले. भाऊ घोडके यांनी आभार मानले. यावेळी शाहू कॉलेजचे प्राचार्य एल. डी. कदम, उपप्राचार्य किल्लेदार, एम.बी. शेख, विक्रांत पाटील, निलेश मिसाळ, उमेश कडोलीकर, समीर चौगुले किरण भोसले लहुजी शिंदे, अशोक पवार उपस्थित होते.