+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustवस्ताद बाबूराव चव्हाण यांचे निधन adjustकागल-पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी-धैर्यशील माने adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार
1000926502
1000854315
schedule01 Aug 24 person by visibility 183 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने मनोव्हेंबर, २०२४ पासून  हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धां होणार आहेत. या स्पर्धेसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. सांस्कृतिक कार्यमंत्री  सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव  विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे  चवरे यांनी नमूद केले आहे.
  २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी माहे ऑक्टोबर, २०२४ पासून विविध १० केंद्रांवर तर ६२ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर, २०२४ पासून आयोजित करण्यात येणार आहे. 
   नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका  २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.
    मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.
    स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने सरकारने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल. 
   राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन चवरे यांनी केले आहे