+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Apr 24 person by visibility 49 categoryजिल्हा परिषद
वाळवा , शिराळा तालुक्याने खंबीरपणे साथ द्यावी : सत्वशील माने
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गेल्या दहा वर्षात विकास कामासाठी जेवढा निधी आला नाही , त्याच्या शतपटीने निधी खासदार धैर्यशील माने यांनी गेल्या पाच वर्षात हातकणंगले लोकसभा मतदार संघात खेचुन आणला आहे . मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी त्यांना वाळवा तालुक्याने खंबीर साथ देवुन प्रचंड मताधिक्याने निवडुन देण्याचे आवाहन सत्वशील माने यांनी वाळवा व शिराळा तालुक्याच्या संपर्क दौऱ्यात केले. संपर्क दौर्‍यात माजी मंत्री सदाभाऊ खोत, गौरव नायकवडी,भीमराव माने, सागर खोत , स्वरूपराव पाटील उपस्थित होते .
   यावेळी सत्वशील माने यांनी वाळवा तालुक्यातील येवलेवाडी, शेने, कलामवाडी, केदारवाडी, मिरजवाडी , मर्दवाडी, तुजारपूर तसेच शिराळा तालुक्यातील कनदूर, पूनवत, कुसाईवाडी, पन्हाळवाडी, शिरये आदी गावातील मतदारांशी संपर्क साधला.  तसेच संपर्क दौऱ्यात गावातील तरुण मंडळांनी प्रचारामध्ये प्रतिसाद दिला.