+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे adjust बदलीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार adjustग्रामसेवकांच्या विरोधात सीईओंच्याकडे तक्रारी adjustकेआयटी रेडी इंजिनियरमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल adjustप्रा.ऋतुराज कुळदीप यांच्या पुस्तकाचे प्रकाशन adjustख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर मनोरंजननगरी, माशांच्या नानाविध जाती ! adjustडीवाय पाटील फार्मसीत जी पॅट परीक्षेबाबत मार्गदर्शन adjustआचारसंहितेमुळे शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक ! शिक्षक संघाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट adjustजिल्हा परिषदेत ई-ऑफिस प्रणाली ! फायलींचा प्रवास-दिरंगाई समोर येणार !!
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule02 May 24 person by visibility 110 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी घर टू घर धनुष्यबाण चिन्ह पोहोचवा. फक्त विकासकामांवर बोला. पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिक यांना निवडून आणू या. दुसऱ्या कोणत्याही विषयावर भाष्य करू नका. कोणतीही अडचण आली तर मला फोन करा. मी, २४ तास उपलब्ध आहे." असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले
 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. "खिम्याचा कट, धनुष्यबाणावर बोट" या संकल्पनेला अनुसरून ही बैठक झाली. या बैठकीत बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा संजय मंडलिक, धैर्यशील माने हे निवडून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरभरून निधी मिळाला. विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. शहर व जिल्ह्यातील विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी जनता राहिले ही खात्री आहे.निवडणुकीचे चित्र महायुतीच्या बाजूने आहे. कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण चिन्ह घरोघरी पोहोच करा.प्रचाराचे आणखी तीन दिवस आहेत. जोमाने काम करा.निवडणुकीत घर टू घर हा प्रचार प्रभावी ठरतो." शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, रुपाराणी निकम, राहुल चव्हाण, माधुरी नकाते, भाजप महिला आघाडीच्या गायत्री राऊत, दिपाली मोकाशी, शिवसेनेचे शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, यांची भाषणे झाली. किशोर घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी नगरसेवक अजित मोरे, अमोल माने, प्रदीप उलपे, सुनील पाटील, विजय खाडे, प्रकाश गवंडी, हेमंत  आराध्ये, संगिता खाडे, पवित्रा रांगणेकर, गणेश देसाई, विशाल शिराळकर, किरण गवळी, शिवसेनेचे शिवाजी जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, उदय भोसले आदी उपस्थित होते.