Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास आवश्यक : मेघराज राजेभोसलेमहायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीचपुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहातशक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, शिक्षकमधून जयंत आसगावकर, पदवीधरसाठी हर्षदा देशमुखांचा अर्ज ! नेतेमंडळीची उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित!!अकॅडमी रिसर्च इंडेक्समध्ये डॉ. सी. डी. लोखंडे देशात पहिल्यास्थानी ! डॉ. प्रमोद एस. पाटील तिसऱ्यास्थानी !! मंगेश चिवटेंनी भरला शिक्षक मतदारसंघात अर्ज, शिवसेनेचे मंत्री - आमदारांची उपस्थितीगोकुळसाठी समविचारी आघाडीचे पॅनेल बुधवारी जाहीर करणार - सतेज पाटीलगोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडी

जाहिरात

 

वंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास आवश्यक : मेघराज राजेभोसले

schedule07 Oct 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन, कोल्हापूर : वंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष. मेघराज राजे भोसले यांनी व्यक्त केले.
    शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित घटकांचे सिनेमातील स्थान या विषयावर 6 आणि 7 या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मास कम्युनिकेशन विभागात करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.
    राजेभोसले म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरातून झाली. कोल्हापूर ही चित्रपटाची पंढरी आणि केंद्रबिंदू असलेले शहर आहे. या शहरातून वंचित घटकाचे सिनेमातील स्थान हा विषय घेऊन कार्यशाळा होत असल्याचे समाधान आहे. या घटकांचे सिनेमातील स्थान हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असून त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास होणे गरजेचे आहे. वंचित घटकांकडे दुर्लक्ष न करता त्यांना चित्रपटांमध्ये योग्य स्थान दिले पाहिजे. सर्व घटकांना सिनेमात योग्य प्रतिनिधित्व मिळाले, तरच समाजाभिमुख चित्रपटांची निर्मिती होईल. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञान आत्मसात करून ते स्वतःमध्ये रुजवले पाहिजे. 
कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले,मास कम्युनिकेशन विभाग सातत्याने नवनवीन विषय घेऊन विद्यार्थी आणि समाजासमोर येत असतो. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी धडपडणाऱ्या या विभागाकडून मिळणाऱ्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. समाजामध्ये सिनेमाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दृक्-श्राव्य माध्यमाची छाप मोठी असून सिनेमा हे प्रभावी माध्यम आहे. 
कार्यक्रमास नाईट कॉलेज मराठी विभागाचे प्रमुख प्रा. अरुण शिंदे, ज्येष्ठ संपादक डॉ. विजय चोरमारे, चित्रशारदा मासिकाच्या व्यवस्थापकीय संपादक अश्विनी धायगुडे-कोळेकर, चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठडिया, पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, चित्रपट महामंडळाचे कार्यवाह रवी सूर्यवंशी, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख प्रीती भिसे व अभिजीत घागरे यांनी करून दिली. सायली गणेशकर हिने सूत्रसंचालन तर  साक्षी वाघमोडे यांनी आभार मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes