भरधाव ट्रकची टेंम्पोला धडक, चार जण ठार
schedule18 Mar 24 person by visibility 605 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे रविवारी (१७ मार्च) रात्री भरधाव ट्रकने टेंम्पोला धडक दिली. या अपघातामध्ये चार जण ठार झाले. तर सात जण जखमी आहेत.
पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाठार पुलाजवळील सेवा रस्त्यांवर रात्री पावणेआठच्या सुमारास अपघात झाला. टेंम्पोला जोडलेले सेंट्रिंगचे मिक्सर मशिन रस्त्याकडेला सोडताना पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये भादोले येथील कंत्राटदार बाबालाल मुजवावर, सचिन धनवडे व विकास वड्ड हे ठार झाले. पादचारी केशव पासवान (वाठार) ठार झाले. या अपघातातील जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती.