Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड शिक्षकांचा एकच निर्धार, कौस्तुभ गावडेंना आमदार करुन विधानपरिषदेत पाठविणारराज्यभरातील व्यापार -व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची पणनमंत्र्यांच्यासोबत चर्चा ! बाजार समिती पदाधिकारी व्यापाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक!!वीज कामगारांचे हाल करण्यासाठी मेस्माची चाल सरकारने वापरली का? कामगार संघटनेचा सवालसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सवबाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिकआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिकबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी - गर्भपात करणाऱ्या एसपी गॅंगच्या 11 जणांवर मोक्का, राज्यातील पहिलीच कारवाई

जाहिरात

 

सर्जन्स वीकनिमित्त कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे सामाजिक उपक्रम 

schedule08 Jun 26 person by visibility 310 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जागतिक सर्जन दिनानिमित्त असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियातर्फे ८ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत देशभरात "सर्जन्स वीक" साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने कोल्हापूर सर्जिकल सोसायटी, सिटी चॅप्टर ऑफ एएसआयतर्फे विविध सामाजिक शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर कुरुणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

डॉ कुरुणकर म्हणाले,‘पंधरा जून हा जागतिक सर्जन दिन म्हणून साजरा होतो.त्या अनुषंगाने आयोजित सर्जन्स वीकची सुरुवात  ८ जून रोजी सकाळी ११.०० वाजता "डायबेटिक फूट" या विषयावरील जनजागृती झाली आहे. डॉ. भूषण शिंदे आणि डॉ. प्रशांत चौधरी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ९ जून रोजी सकाळी सात वाजता राजाराम तलाव परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आणि त्याच दिवशी दुपारी एक वाजता डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. हर्षवर्धन पोखरकर मार्गदर्शन करतील. १० जून रोजी सकाळी ९ वाजता डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे रक्तदान सप्ताह उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ जून रोजी शाहूपुरी येथील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये डॉ. सागर कुरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅटी लिव्हर रुग्णांसाठी मोफत फायब्रो स्कॅन तपासणी आयोजित करण्यात आली आहे. १२ जून रोजी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे सर्जिकल स्टेपलिंग कार्यक्रम, १३ जून रोजी "सोशल सिक्युरिटी स्कीम फॉर सर्जन्स" या विषयावर सकाळी दहा वाजता डॉ. प्रतापसिंह वरुटे यांचे व्याख्यान आहे.
१४ जून रोजी "हेल्दी सर्जन हेल्दी नेशन" या विषयावर सकाळी दहा वाजता डॉ. आनंद कामत मार्गदर्शन करणार आहेत. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे ही दोन्ही व्याख्याने होतील. नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. पत्रकार परिषदेस सचिव डॉ.मधुर जोशी, खजानिस डॉ. सत्येंद्र ठोंबरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes