कोल्हापुरात धक्कादायक घटना, मुलाने केला आईचा खून
schedule15 Oct 25 person by visibility 412 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातीर राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क भारतनगर येथे मुलाने आईच्या डोक्यात वरंवटा घालून खून केला. बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. दारुला पैसे देत नसल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी, विजय अरुण निकम (वय३५ वर्षे) याला या गुन्हयाप्रकरणी अटक केली आहे. राजारामपुरी पोलिसांनी, विजयला घरातूनच अटक केली. सावित्रीबाई आणि मुलगा विजय हे दोघे भारतनगर येथे राहत होते. विजय हा सेट्रिंगची व डिजीटल फलक लावण्याची काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. त्याची पत्नी आणि दोन मुली विजापूर येथे माहेरी आहेत. विजयने बुधवारी सकाळी दारुच्या नशेत आईकडे पैसे मागितले. पैसे देण्यास आईने नकार दिला. पैसे दिले नाहीत या रागातून त्याने वरंवटा आईच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात सावित्रीबाई या जाग्यावरच ठार झाल्या. विजयने फोन करुन बहिणीला आईचा खून केल्याचे सांगितले. शेजाऱ्यानांही हा प्रकार कळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.