शिवाजी विद्यापीठाच्या टेनिस पुरुष संघाने चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली
schedule04 Dec 23 person by visibility 686 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या वेस्ट झोन इंटर यूनिवर्सिटी लॉन टेनिस (पुरूष) स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने पुणे विद्यापीठाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा जिंकण्याची ही शिवाजी विद्यापीठाची पहिलीच वेळ असल्याने संघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे
ग्वाल्हेर आय टी एम युनिव्हर्सिटी येथे स्पर्धा खेळण्यात आली
उपांत्य सामन्यात गुजरात यूनिवर्सिटी यांच्यावर मात करून शिवाजी विद्यापीठ अंतिम फेरीत प्रवेश केला होता. शिवाजी विद्यापीठाच्या संघात संदेश कुरळे, प्रथमेश शिंदे, पार्थ पाटील, अंकित बठेजा, कफिल कडवेकर यांचा समावेश होता. तसेच डॉ आकाश बनसोडे आणि मनाल देसाई प्रशिक्षक म्हणून काम पाहिले . शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के ,प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे तसेच संचालक , क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ शरद बनसोडे यांनी संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.