+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Jan 23 person by visibility 513 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
शाहू छत्रपती चषक फुटबॉल स्पर्धेत मैदानावर खेळाडूंची झालेल्या मारामारीची कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने गंभीर दखल घेतली असून शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लबला कडक समज दिली आहे. या पुढे दोन्ही संघांनी गैरवर्तन केल्यास संघावर बंदीची टांगती तलवार राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
 केएसएने दोन्ही संघांना कडक समज दिल्याचे पत्र दिले आहे. दोन्ही संघांना ही अखेरचा इशारा असल्याचे बोलले जात आहे. शिवाजीच्या संकेत साळोखे आणि प्रॅक्टिसच्या राहूल पाटीलला मुख्य पंचांनी मैदानावर मारामारी केल्याप्रकरणी रेड कार्ड दाखविले आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना दोन सामन्याची बंदीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच शिवाजीच्या करीम मुरेन आणि प्रॅक्टिसच्या ज्युलियस स्ट्रो यांनी सामन्यानंतर एकमेकाच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार केल्याने त्यांच्यावर एक सामन्याची बंदी आणली आहे. तसेच शिवाजीच्या करण चव्हाण बंदरे, गोलरक्षक मयुरेश चौगुले आणि प्रॅक्टिसच्या अदित्य पाटील, संकेत जाधव यांना कडक समज दिली आहे, असे केएसएच्या प्रशासनाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.