शारंगधर देशमुखांच्याकडे शिवसेनेते संघटनात्मक पद, कोल्हापूर दक्षिण विधानसभा विभागप्रमुखपदी नियुक्ती
schedule31 Oct 25 person by visibility 47 categoryमहानगरपालिका
 
        महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्याकडे शिवसेनेने संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे. शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा विभागप्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी देशमुख यांना नियुक्तीचे पत्र पाठविले आहे. देशमुख यांनी जून २०२५ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. देशमुख हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. दरम्यान कोल्हापुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित नाना कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत देशमुखय यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना देशमुख यांनी, ‘हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून, सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आहे! ’अशा भावना व्यक्त केली.
 
                     
 
 
 
