Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेचा ४१९ कोटीचा शहर विकास आराखडा, चाळीस हजार मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षणकेएमटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी सोमवारी मुंबईत बैठकबदलीसाठी प्रमाणपत्रांची बोगसगिरी, जिपच्या १८ शिक्षकांना नोटीस ! दिव्यांग-आजारपणाची जोडली प्रमाणपत्रे, कारवाईला प्रारंभ !!नव्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा गोकुळचा निर्धारउद्योजकांनी सांगितली यशस्वी उद्योगाची त्रिसूत्री, शहीद महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळाशारंगधर देशमुखांच्याकडे शिवसेनेते संघटनात्मक पद, कोल्हापूर दक्षिण विधानसभा विभागप्रमुखपदी नियुक्तीवारणा विद्यापीठ-चुंगनाम विद्यापीठ दक्षिण कोरियामध्ये सामंजस्य करारनियुक्ती प्रभारी प्र-कुलगुरुंची, नावे चार अन् कुलगुरुंचा फैसला ! विद्यापीठाच्या वाटचालीतील नवा इतिहास !!वळसंगला मिळणार सनमडी-घोलेश्वर तलावातून पाणी ! जत तालुक्यातील २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना !!काँग्रेसकडून तालुकाध्यक्षांच्या निवडी, करवीर, कागल, पन्हाळा, शिरोळचा समावेश

जाहिरात

 

नव्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा गोकुळचा निर्धार

schedule31 Oct 25 person by visibility 27 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योग क्षेत्रासाठी देशातील सर्वात मोठा मेळावा ठरलेला  फीड्‌स टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो २०२५ चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात मोठ्या उत्साहात सुरू झाला. तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानेही सहभाग घेतला आहे.

एक्स्पोचे उद्‌घाटन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. मुश्रीफ म्हणाले, ‘दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल, तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि वैज्ञानिक दृष्टी आवश्यक आहे. संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि नवीन प्रयोग व सुधारणा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल. गोकुळ दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आला आहे. या एक्स्पोमधील आमचा सहभाग शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने जनावरांचे संगोपन आणि पोषण व्यवस्थापन शिकवण्यासाठी आहे.’

या तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये विविध तांत्रिक सत्रे, कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञ शाश्वत दुग्ध व्यवसाय, ऊर्जा बचत, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तावृद्धी या विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. एक्स्पोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन ज्ञान, बाजारपेठेच्या संधी आणि तंत्रज्ञानाची ओळख मिळत आहे. दुग्ध उद्योग नव्या दिशेने वाटचाल करीत असून, या संमेलनामुळे सहकार क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. याप्रसंगी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन ॲ.स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, जाफा फीड्सचे कार्यकारी संचालक डॉ.अमिया नाथ, पारस न्यूट्रिशनचे गणेश शर्मा,  गोकुळचे डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes