उद्योजकांनी सांगितली यशस्वी उद्योगाची त्रिसूत्री, शहीद महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळा
schedule31 Oct 25 person by visibility 43 categoryशैक्षणिक
 
        महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ’स्वतःचा व्यवसाय सुरू करणे म्हणजे आत्मनिर्भरतेकडे पहिले पाऊल आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी धाडस, नियोजन, आणि नवकल्पना हे तीन घटक अत्यावश्यक आहेत.’ असे प्रतिपादन उद्योजक संदीप पवार यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद महाविद्यालयात आयोजित उद्योजकता विकास या विषयावरील कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी तरुणींनी मार्गदर्शन करताना त्यांनी, नोकरीच्या प्रतीक्षेपेक्षा स्वतःचे उद्योग उभारून इतरांसाठी रोजगार निर्माण करावेत असे नमूद केले. या कार्यक्रमात शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी विद्यार्थिनींना आवाहन केले की आपल्यामधील कल्पकता आणि आत्मविश्वास यांच्या बळावर विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन उद्योग सुरू करा, कारण आर्थिक स्वावलंबन हेच खरे सशक्तीकरणाचे लक्षण आहे. त्यांच्या या विचारांनी उपस्थित विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि उत्साहाची नवी चेतना निर्माण झाली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. सिद्धता गौड, प्रा. विशालसिंह कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आयक्यूएससी आणि मास मीडिया विभागाने केले होते. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. दिग्विजय कुंभार यांनी केली. प्रा.तेजस्विनी परबकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शुभांगी भारमल यांनी आभार मानले.
 
                     
 
 
 
