Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेचा ४१९ कोटीचा शहर विकास आराखडा, चाळीस हजार मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षणकेएमटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी सोमवारी मुंबईत बैठकबदलीसाठी प्रमाणपत्रांची बोगसगिरी, जिपच्या १८ शिक्षकांना नोटीस ! दिव्यांग-आजारपणाची जोडली प्रमाणपत्रे, कारवाईला प्रारंभ !!नव्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा गोकुळचा निर्धारउद्योजकांनी सांगितली यशस्वी उद्योगाची त्रिसूत्री, शहीद महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळाशारंगधर देशमुखांच्याकडे शिवसेनेते संघटनात्मक पद, कोल्हापूर दक्षिण विधानसभा विभागप्रमुखपदी नियुक्तीवारणा विद्यापीठ-चुंगनाम विद्यापीठ दक्षिण कोरियामध्ये सामंजस्य करारनियुक्ती प्रभारी प्र-कुलगुरुंची, नावे चार अन् कुलगुरुंचा फैसला ! विद्यापीठाच्या वाटचालीतील नवा इतिहास !!वळसंगला मिळणार सनमडी-घोलेश्वर तलावातून पाणी ! जत तालुक्यातील २९ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना !!काँग्रेसकडून तालुकाध्यक्षांच्या निवडी, करवीर, कागल, पन्हाळा, शिरोळचा समावेश

जाहिरात

 

बदलीसाठी प्रमाणपत्रांची बोगसगिरी, जिपच्या १८ शिक्षकांना नोटीस ! दिव्यांग-आजारपणाची जोडली प्रमाणपत्रे, कारवाईला प्रारंभ !!

schedule31 Oct 25 person by visibility 95 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : सोयीच्या बदलीसाठी दिव्यांग आणि आजारपणाची खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाईची छडी उगारण्यास सुरुवात झाली आहे. बदलीसाठी सदोष प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या १८ शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नोटीस काढली आहे. खोटी प्रमाणपत्रे सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी प्रशासकीय व कायदेशीर कारवाई का करू नये ? अशी नोटिसा शुक्रवारी (३१ ऑक्टोबर २०२५) काढल्या. संबंधित शिक्षकांकडून सात दिवसात खुलासा मागविला आहे. यामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातील शिक्षकांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या १८ जून २०२४ च्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. संवर्ग एकमधील या बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी दिव्यांग व आजारपणाची खोटी प्रमाणपत्रे सादर केली आहेत अशा तक्रारी झाल्या. त्यानुसार राज्य सरकारने संवर्ग एकमधील शिक्षक जे बदली प्रक्रियेत होते त्या साऱ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे ठरविले. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची प्रमाणपत्रे जोडली होती.

२६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष आढळले आहेत. त्यापैकी दोघे गैरहजर व कागदपत्र सादर न केलेले दोघे अशा चार शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर चार शिक्षक मयत आहेत. उर्वरित १८ शिक्षकांनी जोडलेली प्रमाणपत्रे सदोष आढळल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागातर्फें संबंधित १८ शिक्षकांना नोटिस काढली आहे. प्रमाणपत्रे सदोष आढळल्यामुळे प्रशासकीय व कायदेशीर कारवाई का करु नये यासंबंधी म्हणणे सादर करावे असे नोटिसमध्ये म्हटले आहे. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या सूचनेनुसार या नोटिसा गटशिक्षण अधिकाऱ्यामार्फत संबंधित शिक्षकांना लागू होणार आहेत. शनिवारी, एक नोव्हेंबर किंवा सोमवारी तीन नोव्हेंबर २०२५ रोजी या नोटिसा शिक्षकांना प्राप्त होणार आहेत. त्या शिक्षकांना सात दिवसात म्हणणे सादर करण्याची मुदत आहे.

…………..

शिक्षण विभागाकडून गोपनीयता

खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली आहे. चौघांना निलंबित केले. १८ शिक्षकांना नोटिसा काढल्या. २७ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी मुंबईला पाठविली. मात्र संबंधित शिक्षक कोण, कोणत्या शाळेतील आहेत यासंबंधी शिक्षण विभागाने गोपनीयता बाळगली आहे. शिक्षकांची नावे अद्याप उघड केली नाहीत.

………………………..

कोल्हापूर जिल्हा परिषदेने बदली संवर्ग एकमधील  शिक्षकांना एक सप्टेंबर २०२५ पासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे उपस्थित राहून दिव्यांग व आजाराच्या प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेण्याविषयी कळविले होते. अशा  ३५५ शिक्षकांच्या दिव्यांग व आजाराच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीचा अहवाल आतापर्यंत प्राप्त झाला आहे. ३५५ पैकी  ३०२ शिक्षकांचे अहवाल बरोबर असल्याचे आढळून आले आहेत. तर २७ शिक्षकांचे प्रमाणपत्र अन्य कारणास्तव व पुढील तपासणीसाठी पुणे व मुंबई येथील रुग्णालयात पाठविले आहेत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याबाबत कारवाईचा निर्णय होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes