Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आंतरविद्यापीठ आईस स्टॉक स्पर्धेत विवेकानंद कॉलेजचे यशविवेकानंद कॉलेजमध्ये चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलनरोजगार हमी योजनेतून जतवासियांना लखपती करण्यासाठी प्रभावीपणे कामे करा-मंत्री भरत गोगावले सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये शुक्रवारी फार्मा  एआयआयटी करिअरवर कार्यशाळासंजय घोडावत विद्यापीठाचे एसजीयु आयकॉन पुरस्कार जाहीर, 28 फेब्रुवारीला वितरणशिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय शिक्षण-उद्योग -शासन परिषद स्मॅकचे सुवर्णमहोत्सवी वर्ष, वर्षभर विविध उपक्रम ! औद्योगिक फेडरेशन स्थापण्याचा विचार !!कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता - क्रिडामंत्री दत्तात्रय भरणेमहावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण अजिंक्यपदग्रीन कॉलेज - क्लीन कॉलेज स्पर्धेत शहीद महाविद्यालयाचा तृतीय क्रमांक

जाहिरात

 

शाहू छत्रपतींचा धडाका, भरमूआण्णा, दिनकरराव, केपी, बजरंग देसाई, स्वाती कोरींच्या गाठीभेटी

schedule26 Mar 24 person by visibility 489 categoryराजकीय

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावल्या राजकीय जोडण्या, मान गादीला- मत महाराजांना
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना मतदारसंघात संपर्काचा धडाका लावला आहे. सोमवारी, त्यांनी गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड तालुक्याचा दौरा करत प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार व बिद्री कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी बहुतांश साऱ्याच मंडळींनी
निवडणुकीत साथ देण्याची ग्वाही दिली. या दौऱ्यात काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.
पाटील सोबत होते. महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी संपर्काचा धडाका लावत राजकीय जोडण्या लावल्याने सोमवारचा दौरा हा महत्वपूर्ण
ठरला.
या दौऱ्यात ठिकठिकाणी शाहू महाराजांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. चन्नेकुप्पी येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमर चव्हाण यांच्या निवासस्थानी
आसपासच्या आठ ते दहा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. फटाक्यांची आतषबाजी, शाहू छत्रपती की जय अशा घोषणा देत नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. तिरवडे येथे माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी, ‘मान गादीला - मत
महाराजांना, समतेच्या विचारांची जगभर ख्याती - गुलालात रंगणार शाहू छत्रपती’या आशयाच्या घोषणा देत फलक फडकाविले. दरम्यान शाहू छत्रपती, आमदार पी.एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील हे अन्य पदाधिकाऱ्यांसह सकाळी साडे दहा
वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज येथे पोहोचले. जनता दलाचे नेते स्वर्गीय आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, श्रीमती उर्मिलादेवी श्रीपतराव शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख नेते मंडळींची चर्चा झाली. स्वाती कोरी म्हणाल्या, ‘भाजपाच्या विचारधारेला आमचा विरोध आहे. भाजप पुरस्कृत कोणीही उमेदवार असला तरी त्याला कधीही पाठिंबा दिला नाही. स्वर्गीय आमदार श्रीपतराव शिंदे यांनी कधीही जातीयवादी शक्तींना थारा दिला नाही. समतेचा पुरस्कार केला.’ याची आठवण करुन दिली. यावेळी शाहू छत्रपतींनी साऱ्यांनी मिळून एकत्र् काम करु या असे सांगितले. यावेळी सचिन शिंदे, नगरसेवक सागर पाटील आदी उपस्थित होते.
यानंतर शाहू छत्रपती हे कानडेवाडी, नेसरी, सांबरे या मार्गे बसरगे येथे पोहोचले. नेसरी येथे गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर या दौऱ्यात सहभागी झाले. शाहू छत्रपती व इतर नेत्यांनी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी मंत्री पाटील,
गोकुळचे संचालक दीपक पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ज्योती पाटील यांनी स्वागत केले. जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान चन्नेकुपीतील मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे,
गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवप्रसाद तेली, गोडसाखर कारखान्याचे संचालक विद्याधर गुरंबे,
दिग्विजय कुराडे, कॉम्रेड संपत देसाई, संजय तर्डेकर, वंचितचे अर्जुन दुंडगेकर, संतोष शिरकूड, सचिन कांबळे, बी.के.देसाई आदी उपस्थित होते.
दरम्यान गडहिंग्लज, चंदगडचा दौरा करुन त्यांनी भुदरगड तालुक्यातील नेत्यांची भेटी घेतल्या. गारगोटीत माजी आमदार बजरंग देसाई
यांच्या निवासस्थानी प्रमख नेते मंडळीची बैठक झाली. याप्रसंगी शाहू छत्रपतींचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गोकुळचे
माजी संचालक धैर्यशील देसाई, भुदरगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश शिंदे, राष्ट्रवादीचे संतोष मेंगाणे, बिद्रीचे संचालक संदीप पाटील, राष्ट्रवादीचे संतोष मेंगाणे, वंचितचे दशरथ दिक्षांत, तालुका संघाचे एम. डी. पाटील, नारायणराव पाटील आदी उपस्थित होते. देसाई यांनी ,‘काही काळजी करायचे नाही’असा शब्द नेते मंडळींना दिला. या दौऱ्यात गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समिती सभापती भारत पाटील, माणिक मंडलिक, संग्राम यादव, नंदू बामणे आदींचा सहभाग होता.
……………………………..
सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाचे दर्शन
या संपर्क दौऱ्यात शाहू छत्रपती यांनी हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सावतवाडी उर्फ नेसरीचे सरपंच धोंडिबा नांदवडेकर, कानडेवाडीचे सरपंच दिलीप
देसाई यांनी शाहू छत्रपतींचे स्वागत केले.
……………………….
के.पी. पाटलांनी केला कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार
मुदाळ येथे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या निवासस्थानी शाहू छत्रपती, पी. एन. पाटील, व्ही. बी. पाटील व के.पी यांच्यामध्ये चर्चा झाली. ’शाहू छत्रपती यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे.’असे नमूद करत कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. जवळपास अर्धा तास या नेते मंडळीत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत साऱ्यांनी एकत्र राहू अशी साद नेत्यांनी घातली. यावर के.पी. पाटील यांनी ‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा फोटो आम्ही काढलेला नाही. आणि तुम्ही येणार म्हणून लावलेला सुद्धा नाही.हा फोटो कायम आहे.’अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी व्ही. बी. यांच्याकडे पाहत केली.
…………………………………
दिनकरराव जाधव म्हणाले, शाहू छत्रपती हे उत्कृष्ट आणि चांगले उमेदवार
तिरवडे येथे माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या निवासस्थानी जणू मेळावा झाला. माजी आमदार जाधव यांनी, ‘ लोकसभेसाठी
महाविकास आघाडीने शाहू छत्रपतींच्या माध्यमातून कोल्हापूरसाठी अतिशय उत्कृष्ट आणि चांगले उमेदवार दिला आहे.’असे उद्गगार काढताच
उपस्थितांनी टाळयांचा कडकडाट करत स्वागत केले. सत्यजित जाधव यांनी, ‘ जवळपास दोन तपांनी काँग्रेसला उमेदवारी मिळाली आहे.
शाहू छत्रपतींना देशात सर्वाधिक मतांनी निवडून देऊ या. समतेचा पुरस्कार करणाऱ्या, सर्वांना सोबत घेऊन जाणारे हे व्यक्तिमत्व आहे. ’
याप्रसंगी शहाजी देसाई, तात्यासाहेब जाधव, पांडूरंग सुतार, सुरेश देसाई, रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes