शिरोलीसाठी स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करावी-पालकमंत्र्यांना निवेदन
schedule11 Feb 25 person by visibility 121 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुलाची शिरोली गावचा समावेश कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये न करता, शिरोली गावासाठी स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करावी. अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली.याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आले.
पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले व माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्री आबिटकर यांना देण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पुलाची शिरोली गावाची भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्येचा विचार करता गावासाठी स्वतंत्र नगरपरिषद होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, प्रवीण यादव, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शिवाजी पाटील, अशोक खोत, सर्जेराव डांगे, सिद्धू पुजारी उपस्थित होते.