रोटरी क्लब करवीर तर्फे शनिवारी हृदयासंबंधी परिसंवाद
schedule28 Sep 22 person by visibility 342 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जागतिक हृदय दिनाच्या हृदयरोगाबाबत असणारे समाज व गैरसमज याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ करवीर आणि शिंदे सुपर स्पेशलिटी हार्ट क्लिनिक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.१ ऑक्टोबर) हृदयाविषयी परिसंवाद आयोजित केला आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल अशी माहिती क्लबचे अध्यक्ष प्रशांत पाटील व सचिव स्वप्नील कामत यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते परिसंवादाच् उद्घाटन होईल. याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हृदयरोगाबद्दल डॉ. आलोक शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोल्हापूर आहारतज्ज्ञ रुफिना कुटिन्हो या आरोग्यदायी हृदयासाठी आहार याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेच्यानिमित्ताने रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरामध्ये करण्यात येणार आहेत. तसेच इसीजी, इको या चाचण्या व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला निलेश भादुले प्रवीण शिंदे उपस्थित होते.