महापालिका शिक्षक पतसंस्थेवर मनोहर सरगर, सुनील नाईक यांची निवड
schedule20 Mar 23 person by visibility 553 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी मनोहर सरगर तर कार्यकारी संचालकपदी सुनील नाईक यांची एकमताने निवड झाली.
पतसंस्थेचे सभापती उमर जमादार, उपसभापती कुलदीप जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
या बैठकीस संस्थेचे मानद चिटणीस सुधाकर सावंत, खजानिस संजय पाटील, वसंत आडके, लक्ष्मण पवार, राजेंद्र गेंजगे, भारती सुर्यवंशी, मनीषा पांचाळ, विलास पिंगळे, प्रभाकर लोखंडे, नेताजी फराकटे, विजय सुतार, विजय माळी, तानाजी पाटील, बाळासाहेब कांबळे, उत्तम कुंभार, मंगेश चव्हाण उपस्थित होते.