महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष ग्रंथाचे रविवारी प्रकाशन
schedule09 May 25 person by visibility 35 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : साहित्यिक डॉ. विश्वास सुतार लिखित महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष या महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवारी (११ मे २०२५) रोजी सायंकाळी ५.३० वाजा राजर्षी शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, या ठिकाणी होणार आहे. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण हे असणार आहेत. निर्मिती प्रकाशन, प्रकाशित जगतज्योती महात्मा बसवण्णा यांचे ऐतिहासिक कार्यकर्तृत्व व जीवन संघर्ष मांडणारा, जातीअंताची भूमिका घेऊन मानवतावाद जोपासणारा आणि त्यांच्या मानवी मूल्यांची आधुनिकता या पुस्तकात मांडली आहे. महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सरला पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून शाहूवाडी येथील व्याख्याते एम. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रकाशन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल म्हमाने, डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.