+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसब- ज्युनिअर बॉईज फुटबॉल संघासाठी शनिवारी निवड चाचणी adjustराज्य बास्केटबॉल संघात समीक्षा पाटील adjustकावळा नाका, शाहूपुरीत शुक्रवारी पाणी पुरवठा बंद adjustयूपीएससी परीक्षेत विद्या प्रबोधिनीचा विद्यार्थी यशस्वी adjustकोल्हापूर-हातकणंगलेतील मतदानाची फायनल आकडेवारी ! मतदारांच्या कौलविषयी उत्कंठा वाढली !! adjustआर के पोवार यांना पत्नीशोक adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Sep 22 person by visibility 390 categoryशैक्षणिक
मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी._
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
पुणे येथील फ्युरेशिया प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीत येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या  चार विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
कंपनीच्या वतीने प्रथम १८ विद्यार्थ्यांची निवड केली गेली. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना पुणे येथील फ्युरेशिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे च्या ऑफिसमध्ये अंतिम मुलाखतीसाठी निमंत्रित केले गेले. अंतिम निवड चाचणी मधून श्वेता मगदूम,राजलक्ष्मी बाबर,वृषाली भोसले,सृष्टी रावल या चार विद्यार्थिनींना निवडण्यात आले.कंपनीच्या वतीने या सर्व विद्यार्थिनींना ५.५ लाखाचे वार्षिक पॅकेज दिले गेले आहे.
महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ.अमित सरकार, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.यू.एस.भापकर ,मेकॅनिकल विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा.प्रवीण गोसावी व प्रा.आशिष पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना राहिले.
महाविद्यालयाचे अध्यक्ष  सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली , सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, शैक्षणिक सल्लागार डॉ. मोहन वनरोट्टी,प्रभारी संचालक डॉ. एम. एम. मुजुमदार यांनी सर्व विद्यार्थिनींचेअभिनंदन केले आहे.