रविकिरण पराडकरांच्या कृतज्ञ मी पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
schedule25 Mar 23 person by visibility 589 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : निवृत्त सहायक पोलिस आयुक्त व कवी रविकिरण पराडकर यांच्या ‘कृतज्ञ मी’या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (ता.२५ मार्च) होत आहे.
दि न्यू एज्युकेशन सोसायटी आणि रविकिरण पराडकर मित्रमंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठ परीक्षा मंडळाचे निवृत्त संचालक डॉ. बी. एम.हिर्डेकर, दि न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संस्थेच्या राम गणेश गडकरी सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता हा समारंभ होत आहे.