सतेज पाटलांनी केला केएमटीने प्रवास, प्रवाशांशी साधला संवाद
schedule08 Jan 26 person by visibility 35 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत सत्ता आल्यानंतर महिलांना व शालेय-कॉलेज विद्यार्थ्यांना केएमटीचा मोफत प्रवास, महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी, आठ जानेवारी रोजी बसने प्रवास केला. तसेच केएमटीतून प्रवाशांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना केएमटीचा मोफत प्रवास ही योजना जाहीर केली आहे. आमदार पाटील यांनी जाहीरनाम्यातील विविध योजनांची माहिती दिली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.