विवेकानंद कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र, महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजन
schedule08 Jan 26 person by visibility 109 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील हिंदी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष आणि महाराष्ट्र हिंदी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ व दहा जानेवारी २०२६ या कालावधीत हिंदी गीत और गजल विविध परिदृश्य या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र होत आहे. तसेच महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशनाचे आयोजन केले आहे.
चर्चासत्राचे उदघाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.इरेश स्वामी, डॉ.वसंत मोरे, महाराष्ट्र हिंदी परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.मधुकर खराटे, डॉ. पांडुरंग पाटील, महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल काळे, आय.क्यु.ए.सी. समन्व्यक डॉ. श्रुती जोशी यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे.
चर्चासत्राचे बीजभाषक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. गजानन चव्हाण हिंदी गीज आणि गजल या विषयावर मार्गदर्शन करतील. चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात हिंदी गीत और गजल सामाजिक परिदृश्य् या विषयावर डॉ.पंढरीनाथ पाटील, डॉ.देवीदास बामणे, डॉ.नाजिम शेख मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात हिंदी गीत और गजल : राजनीतीक एवं आर्थिक परिदृश्य् या विषयावर डॉ.भाऊसाहेब नवले, डॉ सुरेश शेळके, डॉ विठृलसिंह ढाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रा हिंदी गीत और गजल : नारी विषयक परिदृश्य् या विषयावर डॉ. विद्या शिंदे, डॉ.प्रतिभा येरेकर, डॉ.अरुण घोगरे, डॉ. शाहीन पटेल हे मार्गदर्शन करणार आहेत.चौथ्या हिंदी गीत और गजल : धार्मिक एवं सांस्कृतिक परिदृश्य् या विषयावर डॉ. साताप्पा चव्हाण, डॉ.मिथिलेश अवस्थी, डॉ.हाशमबेग मिर्झा, डॉ. गोविंद बुरसे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर पाचव्या सत्रात हिंदी गीत और गजल : अन्यान्य् परिदृश्य् या विषयावर डॉ. सुनिल बनसोडे, डॉ. सात्तापा सावंत, डॉ. दीपक पवार, डॉ.जालिंदर इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
समारोप सत्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख चंद्रदेव कवडे, डॉ जिजाबराव पाटील, मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभागप्रमुख डॉ.दत्तात्रय मुरुमकर , डॉ.बाबासाहेब कोकाटे, महाराष्ट्र हिंदी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ अनिल साळुंखे हे उपस्थित राहाणार आहेत. या चर्चासत्राचा लाभ शिक्षणप्रेमी, अभ्यासक, व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.पी.थोरात, हिंदी विभागाचे प्रमुख व समन्वयक डॉ. आरिफ महात आणि सहसमन्वयक डॉ. दीपक तुपे यांनी केले आहे.