संध्यादेवी कुपेकरांनी दिला शाहू छत्रपतींना पाठिंबा
schedule02 Apr 24 person by visibility 297 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चंदगड-गडहिंग्लजच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच लवकचर आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावाही आयोजित केला जाईल असे सांगितले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेण्याचे नियोजित आहे. माजी आमदार कुपेकर यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची ताकत वाढताना दिसत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील निवासस्थानी भेट घेतली.यावेळी नंदाताई बाभूळकर उपस्थित होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत. शाहू छत्रपती यांनी विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मंगळवारी, (दोन एप्रिल) दुपारी शाहू छत्रपती व व्ही. बी. पाटील हे माजी आमदार कुपेकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा केली.
यावेळी कुपेकर यांनी शाहू छत्रपतींना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला. शिवाय प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले. शाहू छत्रपतींच्या निवडणूक प्रचारार्थ चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ. या मेळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर मेळावा घेण्याचे नियोजित असल्याचे सांगितले. या भागातून मोठे मताधिक्य देऊ असेही
कुपेकर यांनी सांगितले.