Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमची युती सत्तेसाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी - जनतेच्या भल्यासाठी : हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगेकेआयटी बेस्ट नॉलेज सेंटर या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितडीवाय पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचमध्ये सहभागकागलमधील भाजपा कार्यकर्त्यांनी माफ करावे - जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलसत्तेच्या गडबडीसाठी मुश्रीफांनी जनतेला फसविले, वापरा व फेका ही त्यांची निती - संजय मंडलिकांचा हल्लाबोलहिस्ट्री रिपीटस अगेन ! नेत्यांचे गळयात गळे – कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर !!राज्यस्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेत मेन राजारामला सुवर्णपदक ! फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव !!विषयनिहाय विद्यार्थ्यांचे अपडेट ज्युनिअर कॉलेजिअसचा आळशीपणा ! माध्यमिक शिक्षणकडून दोन दिवसाची मुदत !!शिक्षक बँकेतील राजकारण उफाळले ! सत्ताधारी- विरोधकांत वाकयुद्ध, आजी - माजींचा कारभार चव्हाटयावर!!चंदगड नगरपंचायतसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, आमदार शिवाजी पाटलांच्या उपस्थितीत घोषणा

जाहिरात

 

आमची युती सत्तेसाठी नव्हे तर कागलच्या विकासासाठी - जनतेच्या भल्यासाठी : हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे

schedule18 Nov 25 person by visibility 137 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कागलच्या राजकारणात मुश्रीफ गट आणि राजे गटात पहिल्यांदाच आघाडी होते असे काही नव्हे. २०११ ते २०१६ या कालावधीत कागल नगरपालिकेत आमची आघाडी होती. त्यावेळी आम्ही  दोघांनी  मिळून  जो विकासात्मक कारभार केला तो आजही लोकांच्या समोर आहे. आताही आमची युती ही कागलच्या विकासासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी झाली आहे. केवळ सत्तेसाठी आमची युती नाही’ अश्हाी स्पष्ट भूमिका मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत मांडली.

कागल नगरपालिकेत मंत्री मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांची आघाडी झाली आहे. त्यांनी मंगळवारी, कागल येथील मटकरी हॉल येथे दोन्ही आघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा झाला. या मेळाव्यापूर्वी दोघांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या निवडणुकीत समरजितसिंह घाटगे व अखिलेशराजे घाटगे यांची छत्रपती शाहू आघाडी आहे. शाहू आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष मिळून नगरपालिका निवडणूक लढवित आहेत.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘वरिष्ठ पातळीवरुन आमच्यातीव संघर्ष मिटवण्याचे ठरले. बैठक झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी या घडामोडी झाल्या. दोन्ही गटातील संघर्षात कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री मुश्रीफ आणि मी दोघांनीही काही पावले पुढे टाकली. या कालावधीत कार्यकर्त्याशी चर्चा करायला वेळ मिळाला नाही. यामुळे आम्ही दोघांनीही दिलगिरी व्यक्त् केली आहे. विकासात्मक कामासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. अदृश्य शक्तीचा हात असेल तर ही आमची युती आगामी काळात बरीच वर्षे टिकेल. आमच्या दोघांत उत्तम समन्वय आहे. कार्यकर्त्याच्यातील मतभेद, गैरसमज दूर करू.’ असे म्हणाले.

शरद पवारांना सांगून नगरपालिकेत शाहू आघाडी

वरिष्ठ पातळीवर म्हणजे नेमके कोणी ही आघाडी घडवून आणली ? तुमच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला काय ? या प्रश्नावर समरजितसिंह घाटगे यांनी आपण योग्य वेळी बोलू, सगळे पत्ते खुले करू.’असे सांगत याविषयी जादा बोलणे टाळले. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केलेल्या टीकेवर घाटगे यांनी, ‘व्ही. बी. पाटील हे सिनीअर आहेत. त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती शाहू आघाडी करुन लढविणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना सांगितले होते. तसेच व्ही. बी. पाटील यांनाही कल्पना दिली होती. व्ही. बी. यांचे मुश्रीफ यांच्यावर जादा प्रेम असल्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका केल असावी ’असे सांगितले.   

समरजितराजेंचे भविष्य मला माहित नाही, ते खासदार होतील की आमदार हे त्यांचे वरिष्ठ ठरवतील

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘कागलच्या राजकारणात अशा आघाडया यापूर्वी झाल्या आहेत. शामराव भिवाजी पाटील, सदाशिवराव मंडलिक, सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे, मी व संजय घाटगे यांच्यामध्ये राजकीय संघर्षही झाला. नंतर आघाडयाही झाल्या. कागलच्या विकासासाठी आणि राजकीय संघर्ष संपविण्यासाठी मी व समरजितसिंहराजे एकत्र आलो आहोत. विकासासाठी हातात हात घालून काम करायचे ठरविले आहे. अनपेक्षितरित्या झालेल्या आमच्या आघाडीमुळे काही जणांचे गैरसमज झाले असतील तर ते दूर करू. माजी आमदार संजय घाटगे व गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे यांच्यासोबत बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी बोलणार आहे. ते खासदार होतील का, आमदार होतील का हे त्यांचे वरिष्ठ ठरवतील. ते युतीचे घटक आहेत. मी, समरजित व संजय घाटगे असे तिघेही आम्ही युतीचे घटक आहोत. समरजितसिंह घाटगे आणि आमची युती आगामी काळातही कायम राहिल. मी मोठया मनाचा, भाबडा माणूस आहे. समरजितसिंह घाटगे यांचे भविष्य काय असेल हे मला माहित नाही. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांना पदवीधर मतदारसंघातून आमदार करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कागल नगरपालिकेत समरजितसिंह घाटगे व आमची आघाडी झाल्यावर  माजी खासदार संजय मंडलिक यांनी ज्या शब्दांत टीका केली ते योग्य नाही. मंडलिकांनी इतके अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती. ’

पत्रकार परिषदेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, छत्रपती शाहू आघाडीचे अखिलेश घाटगे, शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिह घोरपडे, संचालक सतीश पाटील, एम. पी. पाटील, कृष्णात पाटील, सुनील मगदूम, शिवसिंह घाटगे, उमेश सावंत, जयवंतराव रावण, दीपक मगर गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, विकास पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शीतल फराकटे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes