+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअध्यात्मिक क्षेत्रातील दोन गुरुजनांची सुमंगलमस्थळी भेट ! श्री श्री रविशंकरजींनी केले काडसिद्धेश्वर स्वामींच्या कार्याचे कौतुक !! adjustकेआयटीच्या सहा विद्यार्थिनींना नऊ लाखांचे पॅकेज adjustजिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेस प्रारंभ adjustव्यवस्थापन परिषदेसाठी विकास आघाडीचं ठरलं ! पृथ्वीराज पाटील, आर.व्ही.शेजवळ बिनविरोध-शिक्षक-पदवीधरमध्ये निवडणूक !! adjustकणेरी मठ परिसरात साकारतेय सुमंगलमची अनोखी दुनिया ! adjustदीड लाखाची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जाळ्यात adjustअशोक नायगावकर यांचा बुधवारी अमृतमहोत्सवी गौरव समारंभ adjustगणपतीपुळेत समुद्रात बुडणार्‍या कोल्‍हापुरातील महिलेला वाचवले adjustशिवाजी - प्रॅक्टिस फुटबॉल संघाला कडक समज adjustपाटाकडीलला खंडोबा तालीमने रोखले, ऋणमुक्तेश्वर-संध्यामठ सामना बरोबरीत
Screenshot_20230119_101631
Screenshot_20230106_231953
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule06 Dec 22 person by visibility 80 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज  1  प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्‍यावतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील, संचालक युवराज पाटील व अधिकारी यांच्‍या उपस्थितीत अभिवादन करण्‍यात आले.
  यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, " भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. भविष्यातही त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली मूल्ये निश्चितच प्रेरणादायी असतील. एखाद्या दीपस्तंभासारखी आपल्याला मार्गदर्शक ठरतील." 
यावेळी गोकुळचे चेअरमन श्री. विश्‍वास पाटील, संचालक युवराज पाटील, व्‍यवस्‍थापक पशुसंवर्धन डॉ. यु. व्ही. मोगले,  संकलन सहायक व्यवस्‍थापक दत्ता वाघरे, एम. पी. पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.