Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाचगावमध्ये डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचे  श्रमसंस्कार शिबीर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्चपूर्वी होणार नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्टच्या सदस्यांची महापौरसोबत चर्चा मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर  लवकरच मार्ग काढू : शिक्षणमंत्री दादा भुसेमहापालिकेत शारंगधर देशमुख - आदिल फरासांत हमरीतुमरी! !भोई समाजाचे मार्चमध्ये राष्ट्रीय अधिवेशनज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवसमैदानासह नाट्यगृहाचेही बांधकाम चुकीच्या पद्धतीने, कार्यकर्त्यांनी वेधले लक्षमाझे शहर…माझी जबाबदारी ! एकाचवेळी चार हजार हात स्वच्छतेसाठी सरसावणार !संजय घोडावत यांना द ज्वेल्स ऑफ इंडिया पुरस्कार

जाहिरात

 

जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्चपूर्वी होणार

schedule25 Feb 26 person by visibility 128 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : राज्यातील बारा जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. आता साऱ्यांच्या नजरा  जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे लागलेले आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने बारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व 125 पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी 20 मार्च 2026 पूर्वी सदस्यांची बैठक घ्यावी अशा सूचना केल्या आहेत ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बा म आसोले यांच्या सहीनिशी हे पत्र आहे.
 कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, लातूर सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि परभणी या जिल्हा परिषदेच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी झाल्या होत्या. नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर अध्यक्ष व सभापती निवडीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा  मतदारसंघांमध्ये वेगवेगळी समीकरणे होती. महायुतीमधीलच घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकाविरोधात उभे राहिले होते. मात्र निवडणुकीनंतर महायुती म्हणून ते सगळे एकत्र आले आहेत. मात्र संख्याबळावरून अध्यक्षपदावर महायुतीतील तिन्ही घटक पक्षांचा दावा सुरू आहे. काही ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे. अन्य पक्षांना  सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली करत आहेत. दरम्यान अध्यक्ष व सभापती निवडीचा कार्यक्रम लांबणीवर पडल्यामुळे राजकीय चर्चा ही रंगला होत्या. दरम्यान ग्रामविकास विभागाने बुधवारी 25 फेब्रुवारी 2026 रोजी बारा जिल्हा परिषद अध्यक्ष व 125 पंचायत समिती सभापती निवडीसाठी 20 मार्च 2026 पूर्वी बैठका घ्याव्यात असे पत्र काढले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes