रस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी
schedule17 May 24 person by visibility 395 categoryमहानगरपालिका
कृती समितीची बैठक बोलावून चर्चा करण्याच्या दिले आदेश
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पावरून शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या विषयाची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आयुक्त के. मंजूलक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. परदेश दौऱ्यावर म्हणजेच स्पेनमध्ये असलेल्या पालकमंत्री मुश्रीफ यांनी दूरध्वनीवरून रस्त्यांच्या कामासंदर्भात सूचना दिल्या. या संदर्भात कृती समितीला बोलावून घेऊन तात्काळ बैठक घ्या. सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पाबाबत कृती समितीचे म्हणणे आणि सूचना जाणून घ्या. या कामांमध्ये तातडीने प्रगती करा, अशा सूचना दिल्या. या रस्ते प्रकल्प कामाची जी काय वस्तुस्थिती असेल ती जशीच्या तशी जनतेसमोर येऊ द्या, असेही मंत्री मुश्रीफ यांनी आयुकत मंजूलक्ष्मी आणि शहर अभियंता सरनोबत यांना सांगितले आहे.