डीवाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये रिझ्युम रायटिंग कार्यशाळा
schedule26 Mar 23 person by visibility 405 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रिझ्युम रायटिंग या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेमध्ये सिव्हील, मेकॅनिकल, कॉम्प्युटर विभागातील शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी, ‘नोकरीची संधी मिळण्यामध्ये बायोडाटाला खूप महत्त्व आहे. नोकरीसाठी स्पर्धा असताना एखाद्याचा बायोडाटा हा नोकरीचे द्वार खुले करण्याचा राजमार्ग ठरू शकतो.’ या विषयावर मोहनलाल मालू यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या समन्वयक वनिता पाटील, कार्यशाळा समन्वयक प्रा. नितीन माळी, प्रा. धैर्यशील नाईक उपस्थित होते.