Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पदोन्नती प्रक्रियेला ब्रेक ! पदाधिकारी -अधिकारी - शिक्षक संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक !!केआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची  निवड !! जज डडसांगलीत शिक्षकांच्या आंदोलनाला प्रतिसाद, बहुसंख्य शाळा बंदकोल्हापूरात चार ऑगस्टला राज्यव्यापी परिषद, बाजार समितीच्या सेस विरोधात आंदोलनाची दिशा ठरणारचुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षकांचा हल्लाबोल, सरकार- प्रशासनाविरोधात उमटला रोषजिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहायकावर कारवाईची मागणीतीन महिन्यात तीन अध्यक्ष, गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी प्रदीप मालगावेसंस्थेच्या नावांनी बनावट नियुक्ती आदेश, चार शिक्षिकांसह लिपिकाविरोधात पोलिसात गुन्हाविवेकानंद कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. मिलिंद हुजरे

जाहिरात

 

शहर काँग्रेसमध्ये फेरबदल, सचिन चव्हाणांना हटविले, प्रवीण केसरकर नवे शहराध्यक्ष !जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील ! !

schedule21 May 26 person by visibility 305 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. तर  नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्यावर कोल्हापूर काँग्रेस शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष सचिन चव्हाण यांना या पदावरुन हटविले. चव्हाण हे २०२१ पासून शहराध्यक्षपदावर होते.

अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी. वेणूगोपाल यांनी या निवडी बुधवारी जाहीर केल्या. सप्टेंबर 2019 मध्ये आमदार सतेज पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठे यश मिळवले. शिवाय, कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसने ताकद दाखवल्याने सतेज पाटील यांचे नेतृत्व अधिक बळकट झाले. त्यामुळे पक्षाने त्यांना पुन्हा या पदावर संधी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने शहराध्यक्षपदाचा चेहरा बदलला असून विद्यमान शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या जागी नगरसेवक प्रवीण केसरकर यांना या पदावर संधी दिली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी नगरसेवक केसरकर यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लागली आहे

. काँग्रेसने संघटनात्मक बदल करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी निरीक्षक नेमले होते. कोल्हापूर ग्रामीणसाठी काँग्रेसचे मुख्य निरीक्षक जयशंकर पाठक तर शहरासाठी पक्ष निरीक्षक खासदार प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी कोल्हापूर शहरातील कार्यकर्त्यांशी मते जाणून घेतली होती. त्याचा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवला होता. त्यानुसार या निवडी करण्यात आल्या. यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes