शिवाजी पेठेतील रणधीर खराडे यांचे निधन
schedule19 Mar 24 person by visibility 400 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी पेठेतील सामाजिक कार्यकर्ते व मराठा महासंघाचे माजी शहराध्यक्ष रणधीर खराडे यांचे वयाच्या ५१व्या वर्षी निधन झाले. शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळ शिवजयंती उत्सव समितीत त्यांचा पुढाकार असायचा. व्याख्यानमाला समितीचे अध्यक्षपदी असताना अनेक वक्त्यांच्या माध्यमातून सामाजिक व पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड असायची. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,आई वडील, दोन बंधू असा परिवार आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरूण मंडळाचे माजी अध्यक्ष सखाराम बापू खराडे यांचे ते पुतणे होते.