राजेश कुराश चषक केएसके विजेता
schedule25 Nov 26 person by visibility 18 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील कोल्हापूर शहर कुराश असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या राजेश कुराश चषक स्पर्धेत केएसकेने १३० गुण मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले. सूरज अकॅडमी ५७ गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.
डी सी नरके विद्यानिकेतन आणि अनुश्री स्पोर्ट्स अकॅडमी तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेचे उद्घाटन पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेतील विजेत्या संघास रोख पाच हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघास रोख तीन हजार रुपये आणि चषक आणि तिसऱ्या क्रमांकास चषक श्री किशोर घाटगे. श्रीकांत मंडलिक राहुल चव्हाण गणेश रांगणेकर, सिध्दी रांगणेकर, गौरी माळतकर किरण अतिग्रे यांच्या हस्ते दिले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ऋतुराज जाखलेकर. ऋग्वेदा हुजरे, प्रज्वल यादव, तपस्या यादव, केतन वनबटटे, वेदिका पाटील, रुद्र शेळके, रितिका वडेर, सई मुळीक, श्रीवर्धन महाळुंगेकर, आरुष पाटील, वेदांत जाधव,तनिष शेट्टी यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन तर प्रत्येक वजन गटातील विजेत्या खेळाडूंना सुवर्णपदक रौप्यपदक कास्यपदक देऊन गौरविण्यात आले