जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीतर्फे सेवानिवृत्त सभासदांचा, गुणवंत पाल्यांचा सत्कार
schedule24 Nov 26 person by visibility 37 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी-:कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. तात्यासाहेब मोरे हे प्रमुख व्याख्याते होते. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रमोद बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोसायटीच्या श्री महालक्ष्मी सभागृहात मंगळवारी (२४ नोव्हेंबर २०२६) हा कार्यक्रम झाला.
पाहुण्यांच्या हस्ते १२५ विद्यार्थी, ४५ सेवानिवृत सभासद व पदोन्नती मिळालेला ३ सभासदांचा सत्कार करण्यात आला. जवाहर नवोदय विद्यालय,सैनिक स्कूल, शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसह अन्य परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले. प्रा. मोरे यांनी, सभासद व त्यांच्या पाल्यांना मार्गदर्शन केले.
चेअरमन यांनी जितेंद्र वसगडेकर यांनी प्रास्ताविकामध्ये, ‘सोसायटीतर्फे सभासदांसाठी विविध योजना राबविल्या जातात. सभासदांच्या पाल्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका सुरू केले आहेत. सभासदांना कोअर बँकिग्रा सुविधा देणारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पगारदार पतसंस्था आहे.’असे सांगितले. संस्थेचे मार्गदर्शक एम. आर पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सोसायटीच्या ठेवी २५५ कोटी ९८ लाख इतक्या आहेत. २३५ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सोसायटीला चार कोटी २२ लाख रुपयांचा नफा झाला आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाला संचालक नंदीप मोरे, श्रीकांत चव्हाण, रवींद्र जरळी, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजीत पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, सरदार दिंडे, प्रकाश पाटील, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, तज्ज्ञ संचालक स्वप्निल घस्ते, अनिता कांबळे, संस्थेचे मार्गदर्शक विश्वास साबळे, राजाराम वरुटे, महावीर सोळाकुंरे, एम. एम. पाटील, राजीव परीट, मनोहर भाट, अजित मगदूम, किरण मगदूम, सोसायटीचे व्यवसथापक विजयकुमार बोरगे आदींची उपस्थिती होती.