Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे वाढदिवसानिमित्त राजेश क्षीरसागरांच्याकडून महायुतीच्या नगरसेवकांना मोठं गिफ्ट ! विकासकामांसाठी २५ लाखाचा निधी!!नेता सर्वसामान्यांचा ! दादा  कार्यकर्त्यांचा !!जिल्हा परिषद मतदारसंघ मोठे - समस्या अनेक ! विकासकामांसाठी हवा कोट्यवधींचा निधी, महायुतीच्या सदस्यांनी मांडल्या नेत्यांच्यासमोर भावना!!डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा पन्हाळगडाचा अभ्यास दौरादारु पिऊन कार चालविताना दोघांना उडविले, गोकुळच्या माजी चेअरमनांचा मुलगा पोलिसांच्या अटकेतमहापालिका - गार्डन्स क्लबतर्फे पाच डिसेंबरला विशेष कार्यक्रमवेतनपथक कार्यालयास पूर्ण वेळ कर्मचारी द्या,   खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणीविद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी - सागर बगाडेदहा -दहा महिन्याचा महापौर ठरलंय…मात्र मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम

जाहिरात

 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे

schedule24 Nov 26 person by visibility 9 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: पुणे येथे २७ ते ३० जानेवारी २०२७ या कालावधीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली. कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि संशोधक म्हणून लिंबाळे यांची ओळख आहे. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी, शिवाजी विद्यापीठ येथे मराठी विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. लिंबाळे यांनी साहित्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता, जातिव्यवस्था आणि वंचितांचे प्रश्न मांडले आहेत. त्यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सन्मान’पुरस्कार मिळाला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदाचे शंभरावे संमेलन आहे. पुण्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची पुण्यात मंगळवारी, २४ नोव्हेंबर २०२६ बैठक झाली. या बैठकीनंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी लिंबाळे यांच्या नावाची घोषणा केली.

दलित साहित्यिक म्हणून लिंबाळे यांची ओळख आहे. दरम्यान दलित साहित्यापलीकडे जाऊन त्यांनी लिखाण केले आहे. त्यांनी चाळीसहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ते दलित साहित्याच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक आहेत. २० जुलै १९८४ रोजी प्रकाशित  ‘अक्करमाशी’  आत्मकथा साहित्यविश्वात नावाजली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात हन्नूर येथे एक जून १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. संघर्षमय जीवन जगत त्यांनी स्वतची ओळख निर्माण केली. आंबेडकरवादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात.

दरम्यान पुणे येथे झालेल्या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करायची यासंबंधी विविध साहित्यिकांच्या नावावर चर्चा झाली. यामध्ये साहित्यिक बाबा भांड, विजय कुवळेकर, रमेश पतंगे, श्रीकांत देशमुख, शेषराव मोरे, चंद्रकांत भोंजाळ, उमा कुलकर्णी, प्रवीण दवणे, मंगला गोडबोले, बाबा भांड, पी. एस. लोक, सुधाकर गायधनी आणि लिंबाळे यांचा समावेश आहे. महामंडळाच्या बैठकीनंतर शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लिंबाळे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सोमण यांनी पत्रकार परिषदेत केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes