Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाढदिवसानिमित्त राजेश क्षीरसागरांच्याकडून महायुतीच्या नगरसेवकांना मोठं गिफ्ट ! विकासकामांसाठी २५ लाखाचा निधी!!नेता सर्वसामान्यांचा ! दादा  कार्यकर्त्यांचा !!जिल्हा परिषद मतदारसंघ मोठे - समस्या अनेक ! विकासकामांसाठी हवा कोट्यवधींचा निधी, महायुतीच्या सदस्यांनी मांडल्या नेत्यांच्यासमोर भावना!!डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा पन्हाळगडाचा अभ्यास दौरादारु पिऊन कार चालविताना दोघांना उडविले, गोकुळच्या माजी चेअरमनांचा मुलगा पोलिसांच्या अटकेतमहापालिका - गार्डन्स क्लबतर्फे पाच डिसेंबरला विशेष कार्यक्रमवेतनपथक कार्यालयास पूर्ण वेळ कर्मचारी द्या,   खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणीविद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी - सागर बगाडेदहा -दहा महिन्याचा महापौर ठरलंय…मात्र मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिमआयुष्यात स्ट्रेस हा ताटातल्या मिठाईइतकाच असावा, माणसांनी अवाजवी अपेक्षा न ठेवल्यास जीवनयात्रा आनंदयात्रा बनते

जाहिरात

 

वाढदिवसानिमित्त राजेश क्षीरसागरांच्याकडून महायुतीच्या नगरसेवकांना मोठं गिफ्ट ! विकासकामांसाठी २५ लाखाचा निधी!!

schedule24 Nov 26 person by visibility 44 categoryमहानगरपालिका

वाढदिवसानिमित्त राजेश क्षीरसागरांच्याकडून महायुतीच्या नगरसेवकांना मोठं गिफ्ट ! विकासकामांसाठी २५ लाखाचा निधी!

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘कोल्हापूर महापालिकेतील महायुतीच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी २५ लाख रुपयांचा निधी देत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त नगरसेवकांना प्रभागात काम करण्यासाठी ही भेट असेल.’अशी घोषणा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (एमआरडीपी) अंतर्गत पुराचे अतिरिक्त जवळपास ८० टीएमसी पाणी दुष्काळीभागाकडे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम बनेल. तर कोल्हापूर आणि सांगली ही शहरे पुराच्या पाण्याच्या धोक्यापासून सुरक्षित राहतील.’असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर-सांगली पूरनियंत्रण प्रकल्प अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा कार्यारंभ मंगळवारी २४ नोव्हेंबर २०२६ करण्यात आला. आमदार क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य शेंडापार्क येथे कार्यक्रमाच आयोजन केले होते. महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, प्रा. जयंत पाटील, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिक्षण समिती सभापती शिला सोनुले, सभागृह नेते मुरलीधर जाधव, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

‘कोल्हापूरची हद्दवाढ ही लवकरच होईल.’असा आशावाद व्यक्त करत आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘राज्य सरकार व जागतिक वर्ल्ड बँक यांच्या सहकार्याने कोल्हापूर-सांगली पूरनियंत्रण प्रकल्प होत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प कोल्हापूरसाठी अतिशय उपयुक्त ठरले.  एमआरडीपी प्रकल्प अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोल्हापुरात ५०० हून अधिक कोटी रुपयांची कामे होणार आहेत. यामध्ये शहरातील १८ किलोमीटर नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण व सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे. नाल्याभोवती वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, विरंगुळा केंद्र तयार करण्यात येतील. पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरू नये म्हणून रिटेनिंग वॉल उभारण्यात येणार आहे. १८ महिन्यात कामे पूर्ण करण्याची कंपनीला मुदत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी बारा महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरवासियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण आहे. गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सक्त सूचना कंपनीला आहेत.’

क्षीरसागरांच्या मनातील ईच्छा अंबाबाई देवी पूर्ण करेल

महापौर रुपाराणी निकम यांनी भाषणात,‘ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मनात जी ईच्छा आहे, करवीर निवासिनी अंबाबाई पूर्ण करेल.’अशी सदिच्छा व्यक्त केली. याप्रसंगी प्रा. पाटील, गटनेते देशमुख, फरास, नगरसेवक जाधव यांनी आमदारांना शुभेच्छा दिल्या.

जयंत पाटलांनी केक भरविला, कदमांच्याकडून शाल देऊन सत्कार

महायुतीच्या नगरसेवकांनी आमदार क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या. प्रा. जयंत पाटील यांनी केक भरविला. गटनेते देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट स्वरुपात दिला. सत्यजित कदम यांनी शाल देऊन क्षीरसागरांचा सत्कार केला.

याप्रसंगी नगरसेवक स्वरुप कदम, विजय खाडे, विजय देसाई, नगरसेविका दीपा अजित ठाणेकर, पल्लवी निलेश देसाई, मानसी सतीश लोळगे, मंगल साळोखे, अनुराधा खेडकर, नेहा अभय तेंडूलकर, वंदना विश्वजीत मोहिते, राजनंदा महाडिक, माधुरी किरण नकाते, सृष्टी करण जाधव, संगिता संजय सावंत, प्राजक्ता अभिषेक जाधव, नगरसेवक अजय इंगवले, अभिजीत खतकर, वैभव कुंभार, नियाज खान, बबन मोकाशी, प्रकाश गवंडी, आशपाक आजरेकर, उमेश पागर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes