Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला २८ नोव्हेंबरपासून !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीतर्फे सेवानिवृत्त सभासदांचा, गुणवंत पाल्यांचा सत्कारशंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे वाढदिवसानिमित्त राजेश क्षीरसागरांच्याकडून महायुतीच्या नगरसेवकांना मोठं गिफ्ट ! विकासकामांसाठी २५ लाखाचा निधी!!नेता सर्वसामान्यांचा ! दादा  कार्यकर्त्यांचा !!जिल्हा परिषद मतदारसंघ मोठे - समस्या अनेक ! विकासकामांसाठी हवा कोट्यवधींचा निधी, महायुतीच्या सदस्यांनी मांडल्या नेत्यांच्यासमोर भावना!!डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा पन्हाळगडाचा अभ्यास दौरादारु पिऊन कार चालविताना दोघांना उडविले, गोकुळच्या माजी चेअरमनांचा मुलगा पोलिसांच्या अटकेतमहापालिका - गार्डन्स क्लबतर्फे पाच डिसेंबरला विशेष कार्यक्रमवेतनपथक कार्यालयास पूर्ण वेळ कर्मचारी द्या,   खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी

जाहिरात

 

तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला २८ नोव्हेंबरपासून !

schedule25 Nov 26 person by visibility 23 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २६ वी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला २८ नोव्हेंबर ते चार डिसेंबर २०२६ या कालावधीत होत आहे. ’अशी माहिती ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष ॲड. विवेक शुक्ल आणि श्री .महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सीए केदार हसबनीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रायव्हेट हायस्कूल येथे रोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यानमालेचे पुष्प गुंफले जाणार आहे. व्याख्यानमालेचे यंदा २६ वे वर्ष आहे.

ॲड. शुक्ल म्हणाले, ‘समाजातील प्रत्येक घटकाचे मनोरंजन, ज्ञान, समाजचिंतन व चारित्र्य यांची वृद्धी व्हावी, हा व्याख्यानमाला आयोजित करण्यामागील उद्देश आहे. यासाठी राजकीय, सामाजिक, संरक्षण खाते, कायदेतज्ञ, कलाक्षेत्र तसेच मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील महिला आणि त्या विषयातील निपुण असणाऱ्या जाणकार वक्त्यांना या व्याख्यानासाठी बोलवण्याची परंपरा आहे. तरी या व्याख्यानमालेचा लाभ करवीर नगरीतील हजारो रसिकांनी घ्यावा.’

व्याख्यानमालेमध्ये २८ नोव्हेंबर रोजी ॲड. गौरी पाटील यांचे ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करूया’, २९ नोव्हेंबर रोजी डॉ. अपर्णा बेडेकर यांचे ‘ज्ञानेश्वरीची अपूर्वता’, तर ३० नोव्हेंबर रोजी  मित्रा देसाई यांचे ‘एका देवीचे साम्राज्य ’या विषयावर व्याख्यान आहे. एक डिसेंबर रोजी पुणे येथील डॉ.चंद्रकांत कणसे यांचे, ‘मधुमेह समज व गैरसमज, दोन डिसेंबरला मुंबई येथील मंजिरी देवरस यांचा ‘सुखाचा पासवर्ड ’ या विषयावर व्याख्यान आहे. तीन डिसेंबर रोजी संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी यांची ‘कवितेचं गाणं होताना’या विषयाला अनुसरुन प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आहे. चार डिसेंबर रोजी निवृत्त मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांचे ‘दहशतवाद- भारतापुढील आव्हाने’या विषयावर व्याख्यान होईल.

पत्रकार परिषदेस कार्यवाह श्रीकांत लिमये,  व्याख्यानमाला समिती प्रमुख डॉ. उदय कुलकर्णी, केदार तेंडुलकर, सुहास तेंडुलकर,  रामचंद्र टोपकर, ॲड. राजेंद्र किंकर, नंदकुमार मराठे, किरण धर्माधिकारी, प्रशांत कासार, प्रसाद खाडिलकर, वृषाली कुलकर्णी, ॲड.पूजा जोशी, आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes