+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक adjust कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा अवॉर्ड ऑफ ऑनरने गौरव adjustराजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार - अमल महाडिक adjustकोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !! adjust पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक adjustचांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय adjustशेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !! adjust चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड adjustसासूबाई जोरातमध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट adjustवीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
Screenshot_20230905_091804~2
Screenshot_20230903_122011~2
schedule22 Sep 22 person by visibility 259 categoryसामाजिक
नवरात्रोत्सव काळात भाविकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : नवरात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होवू नये, कोणतीही तक्रार येवू नये, याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. स्थानिक व्यापाऱ्यांचाही या काळात व्यवसाय व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. देवस्थान समितीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावीत आणि प्रस्तावित आराखड्यांच्या प्रती सादर कराव्यात. याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मंत्रालय स्थरावर बैठक लावू, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. नवरात्रोत्सव तयारी आणि प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  
 बैठकीच्या क्षीरसागर यांनी, येत्या नवरात्रोत्सवात देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग, मंडप व्यवस्था, स्वच्छतागृह, मंदिर परिसरातील दुकानदारांच्या समस्या, सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी होणारे वाद, भाविकांच्या मालमत्तेची सुरक्षा, देवस्थान समिती अंतर्गत सुरु असलेली विकासकामे, त्यातील प्रलंबित कामे, प्रस्तावित विकास कामे आदीबाबत माहितीची विचारणा केली.
 याबाबत माहिती देताना देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी  भाविकांच्या वाहनासाठी सुमारे ११ ठिकाणी पार्किंग जागांचे नियोजन केले असल्याचे सांगितले. तसेच इतर उपाययोजनांची माहिती दिली.
 यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी, नवरात्रोत्सव काळात मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात पूर्वापार कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांनाही सामावून घ्यावे. मंदिर परिसरात होणाऱ्या चोऱ्या, पाकीटमारी आदी बाबत रेकॉर्डवरील सराईत गुंडांना ताब्यात घेण्याबाबत पोलीस प्रशासनास सूचना कराव्यात. फिरस्त्यांकडून भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आगामी काळात काम रखडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यासह देवस्थान समितीच्या प्रलंबित विकास कामांसह, प्रस्तावित केलेल्या आणि आवश्यक असलेल्या आराखड्यांच्या व प्रस्तावांच्या प्रती सादर कराव्यात. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून लवकरात लवकर मंत्रालय स्तरावर विशेष बैठक लावून  आवश्यक निधीबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासित केले.
 बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, देवस्थान समितीचे उप- अभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, वास्तुविशारद राजेंद्र सावंत, वास्तुविशारद मनोज पंडीत, रणजीत निकम, ठेकेदार संकल्प पाटील आदी उपस्थित होते.