+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक adjust कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांचा अवॉर्ड ऑफ ऑनरने गौरव adjustराजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे देणार - अमल महाडिक adjustकोल्हापुरात निघणार २५ हजार शिक्षक-कर्मचाऱ्यांचा मोर्चा! आंदोलनात पालकांचाह सहभाग !! adjust पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक adjustचांदेकरवाडीच्या कुस्ती मैदानात सुभाष निऊंगरेचा प्रेक्षणीय विजय adjustशेतकरी संघ बचावासाठी धडक मोर्चा ! पालकमंत्री- जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध !! adjust चेतन नरकेंची मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिटमध्ये निवड adjustसासूबाई जोरातमध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट adjustवीरशैव बँकेला चार कोटी ७१ लाखाचा नफा, सभासदांना दहा टक्के लाभांश
Screenshot_20230905_091804~2
Screenshot_20230903_122011~2
schedule06 Dec 22 person by visibility 249 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर कोल्हापूर: 
महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांच्यावतीने कर्नाटकातील सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त येणा-या भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा आणि अल्पोपहार वाटपची सुरवात करण्यात आली.
 सौंदती येथे भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. कोल्हापुरातून जाणा-या भाविकांना देण्यात येणा-या एस. टी बसेस च्या मागील खोळंबा आकार तसेच इतर सर्व शुल्क कमी करण्यासाठी क्षीरसागर यांनी केलेला पाठपुरावा आणी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश यामुळे हजारो भाविकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. 
दरम्यान सौंदत्ती यात्रेदरम्यान नागरिकांचे आरोग्य बिघडू नये, तसेच बिघडल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने आ. राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा तज्ञ डॉक्टरांच्या टीमच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. त्याचं बरोबर भाविकांसाठी मोफत अल्पोपहार देखील देण्यात येत असून याचा लाभ हजारो भाविक घेत आहेत.