महापालिका प्रशासकांची बदली करा : भाजपाची पालकमंत्र्यांच्याकडे मागणी
schedule05 Apr 23 person by visibility 509 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांची त्वरित बदली करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. भाजपच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री केसरकर यांची सर्किट औषधे भेट घेतली.
जिल्हाध्यक्ष राहूल म्हणाले, कोल्हापूर शहरात महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. या काळात कोल्हापूर शहराचा सर्वागीण विकास होणे अपेक्षित होते परंतु कोणत्याही बाबतीत शहराचा विकास झालेला नाही. गेल्या सव्वा दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असून त्यांनी कोल्हापूरसाठी काहीही केलेले नाही. पाणी, रस्ते, गटर्स, बगीचे, ड्रेनेज, शिक्षण, आरोग्य, केएमटी याविषयात मनपा प्रशासन अस्तिवात आहे की नाही असे वाटावे अशी स्थिती जनतेसमोर आहे. घरफाळा घोटाळा, तोट्यातील केएमटी, रखडलेली थेट पाईपलाईन असे अनेक विषय प्रलंबित आहेत. यासर्व विषयात पालकमंत्री या नात्याने आपण गांभीर्याने लक्ष घालून कोल्हापूर शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत.
भाजपा शिष्ठमंडळाच्या निवेदनाला उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, येत्या ८ दिवसांत भाजपा शिष्ठमंडळाची बैठक महापालिकेच्या प्रशासक व सर्व खाते प्रमुखांसोबत लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्रानी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, नाना कदम, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, संजय सावंत, अमोल पालोजी, विजय आगरवाल, विवेक कुलकर्णी, डॉ.राजवर्धन, अशिष कपडेकर, रमेश दिवेकर, सुधीर देसाई, गिरीश साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, गायत्री राउत आदी उपस्थित होते.